21 May 2024 1:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल
x

अभिजित भुर्के यांचा 'राजकारणाच्या फडा'वरून थेट 'मनसे' राजकारणात प्रवेश

MNS, Raj Thackeray

मुंबई : आज मुंबईमध्ये मनसेचा शिवतीर्थावर भव्य गुढीपाडवा मेळावा पार पडला. तुफान गर्दी उसळलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी अनेकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. सध्या समाज माध्यमांच्या आधारे देखील सुशिक्षित तरुणांना मनसे सारख्या आक्रमक आणि रस्त्यावरील लढाई लढणाऱ्या पक्षात प्रवेश करावासा वाटत आहे, ही पक्षासाठी जमेची बाजू आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे ‘राजकारणाचा फड’ या फेसबुक ग्रुपचे मॉडरेटर अभिजित भुर्के यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष जरी आक्रमक कार्यकर्त्यांचा असला तरी उच्च शिक्षण घेतलेल्या आणि उच्च पदावर काम करणारे तरुण जर मनसेत प्रवेश करत असतील तर त्यांच्या शिक्षणाचा उपयोग पक्षाची भविष्यातील निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी तसेच तंत्रज्ञान आणि त्याचा नियोजनबद्ध वापर कसा करावा यासाठी करून घेणे गरजेचे आहे. पक्षातील प्रत्येकाची ताकद ही वेगवेगळ्या विषयात असते आणि ती पक्षाने ओळखणे आणि त्याला दिशा देणं गरजेचं आहे.

समाज माध्यमांच्या आधारे विविध पक्षातील तरुण अनेक फेसबुक ग्रुप्समध्ये एकमेकांसोबत जोडले जात आहेत. सध्या अनेक फेसबुक ग्रुप्स राजकारणासाठी स्थापन करण्यात आले आहेत, ज्यांचा मूळ उद्देश समाजात विकृती पसरवनं आहे. परंतु असे अनेक ग्रुप्स आहेत जे सामाजिक सलोखा राखण्याचे आणि काय चूकीचं आहे यासाठी देखील काम करताना दिसतात. त्यात ग्रुपच्या ऍडमिन आणि मॉडरेटरची भूमिका महत्वाची असते. ते जरी पूर्णवेळ त्यात नजर ठेवू शकत नसले, तरी वेळेप्रमाणे नियमांचे पालन होतं आहे की नाही किंवा नवे नियम आणून ग्रुप्समध्ये लोकशाही टिकवून ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न करताना दिसतात असं आमच्या समाज माध्यमांच्या टीमचा अनुभव सांगतो. त्यातीलच एक ग्रुप म्हणजे ‘राजकारणाचा फड’ असं समजतं.

जगातील कोणतही तंत्रज्ञान नेहमी दोन प्रकारे उपलब्ध असतं, एक म्हणजे वापरणारा त्याचा सदुपयोग करतो की दुरुपयोग. फेसबुकचा दुरुपयोग २०१४ नंतर प्रचंड वाढला असून, आज २० ते २५ वयोगातील अनेक फेसबुक वापरकर्त्यांना देशातील १९९५ पूर्वीचा इतिहासाचं माहित नसल्याने, त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करून चुकीचा भारत आणि राजकारण त्यांच्यावर लादलं जात आहे, हे अभ्यासाअंती स्पष्ट जाणवतं. त्यामुळे फेसबुकचा सदुपयोग करून अशा तरुणांचे समाज प्रबोधन करण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन फेसबुक ग्रुप्सचा उत्तम सदुपयोग करता येऊ शकतो.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x