10 May 2024 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Alok Industries Share Price | या कंपनीचा शेअर 12 रुपयांचा, आता मुकेश अंबानींची गुंतवणूक, स्टॉकमध्ये रोज अप्पर सर्किट, खरेदी करणार?

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | एकीकडे शेअर बाजारात सलग 7 व्या दिवशी पडझड होत आहे, तर दुसरीकडे ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर या कंपनीचे शेअर्स 12.24 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 12.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील ट्रेडिंग सेशनमधील बंदच्या तुलनेत स्टॉक आज 4.97 टक्के वाढला आहे. 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.07 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्यानंतर सलग दोन दिवस स्टॉक अप्पर सर्किट हिट करत आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 6,077 45 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Alok Industries Share Price | Alok Industries Stock Price | BSE 521070 | NSE ALOKINDS)

डिसेंबर 2022 तिमाही निकाल :
‘आलोक इंडस्ट्रीज’ कंपनीला डिसेंबर 2022 तिमाहीत जबरदस्त तोटा सहन करावा लागला आहे. डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत 0.09 कोटी रुपयांच्या तोट्याच्या तुलनेत कंपनीने या तिमाहीमध्ये 249.83 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे. याचा अर्थ कंपनीचा तिमाही तोटा जबरदस्त वाढला आहे. डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकूण सेल्स 19.91 टक्के घसरून 1705.69 कोटी रुपये झाला होता.

मुकेश अंबानींची मालकी :
फेब्रुवारी 2020 मध्ये, मुकेश अंबानींच्या मालकीच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीने ‘आलोक इंडस्ट्रीज’ कंपनीमधील 37.7 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. हा सौदा फक्त 250 कोटी रुपयांना पूर्ण झाला होता. रिलायन्स व्यतिरिक्त ‘JM फायनान्शियल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी’ नेही ‘आलोक इंडस्ट्रीज’ कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘आलोक इंडस्ट्रीज’ या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीची स्थापना 1986 मध्ये झाली होती. कंपनीच्याअधिकृत वेबसाइटनुसार 1989 मध्ये कंपनीने पहिला पॉलिस्टर टेक्स्चरायझिंग प्लांटची स्थापना केली होती. आणि 1993 मध्ये कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी बनली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alok Industries Share Price 521070 ALOKINDS stock market live on 27 February 2023.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x