5 May 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी
x

Paytm Share Price | पेटीएम कंपनीचे शेअर्सचं नेमकं काय होणार? सुनिल मित्तल यांच्या एका विधानाने मोठ्या हालचाली, डिटेल्स पहा

Paytm Share price

Paytm Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएमच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 8.82 टक्क्यांच्या घसरणीसह 578.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण एका नकारात्मक बातमी मुळे पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसापासून भारती एंटरप्रायझेसचे म्हणजेच एअरटेल कंपनीचे चेअरमन सुनील मित्तल पेटीएम कंपनीचे शेअर्स खरेदी करणार आहेत, अशी बातमी पसरली होती. मात्र मंगळवारी सुनिल मित्तल यांनी सर्व चर्चेला पूर्णविराम दिला आहे. बुधवारी सकाळी (०१ मार्च २०२३) शेअर 2.31% वाढून 611 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Paytm Share Price | Paytm Stock Price | BSE 543396 | NSE PAYTM | One 97 Communications Share Price | One 97 Communications Stock Price)

सुनील मित्तल यांनी पेटीएम कंपनीमधील स्टॉक खरेदी करण्यासाठी कोणतीही चर्चा सुरू नाही अशी माहिती मीडियाला दिली आहे. सुनिल मित्तल यांनी आपण अशा कोणत्याही गुंतवणुक योजनेबद्दल विचार करत नसल्याचे सांगितले आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये माझ्या नावाचा चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे, असे सुनिल मित्तल यांनी म्हंटले आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सॉफ्ट बँक आणि चीनच्या अलीबाबा ग्रुपने पेटीएममधील शेअर्स विकण्याची योजना जाहीर केली आहे. मीडिया रिपोर्टर्ट्सनुसार, अनेक दिग्गज गुंतवणुकदार पेटीएममधून बाहेर पडण्याची तयारी करत आहेत.

पेटीएम ही फिनटेक कंपनी सध्या तोट्यात चालत आहे. मात्र डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये कंपनीचा तोटा कमी झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत या फिनटेक कंपनीला 392 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. ग्लोबल ब्रोकरेज हाऊसेस पेटीएम कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक आहेत. ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांनी पेटीएम कंपनीच्या स्टॉकवर 800 रुपयांची लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ट्रेडलाइन डेटानुसार 11 पैकी 9 तज्ञांनी पेटीएम स्टॉकवर बाय रेटिंग देऊन शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. उर्वरित 2 तज्ञ स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला देत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price 543396 stock market live today as on 01 March 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x