1 April 2023 9:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | या सरकारी मासिक उत्पन्न योजनेत शून्य रिस्कवर गुंतवणूक करा, दरमहा 4950 रुपये मिळतील, पूर्ण माहिती जाणून घ्या Deep Industries Share Price | हा शेअर स्प्लिट होतोय, शेअरची किंमत पाच पट घटणार, खरेदी करणार? IFL Enterprises Share Price | ही कंपनी गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा देणार, कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची घोषणा Apollo Pipes Share Price | या कंपनीच्या शेअरची किंमत इतक्या तेजीत वाढली की गुंतवणुकदार करोडपती झाले, परतावा पाहून गुंतवणूक करा April Month Horoscope | एप्रिल महिन्यात 12 राशींमध्ये कोणाला नशिबाची साथ? कोणासाठी मोठी संधी? तुमचं मासिक राशीभविष्य वाचा Odysse Vader e-Bike | ओडिसे वडर ई-बाइक लॉन्च, फुल चार्ज वर 125 किमी रेंज, 999 रुपये टोकन देऊन बुक करा SRF Share Price | या शेअरने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.20 कोटी रुपये परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस, खरेदी करावा का?
x

Multibagger Stocks | या बँकिंग शेअर्सचा धुमाकूळ, 145 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय, सरकारी बँकेचे स्वस्त शेअर्स सुद्धा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | मागील वर्षीच्या होळीपासून आतापर्यंत तीन बँकिंग शेअर्ससह चार वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये ‘कर्नाटक बँक’ च्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या होळीपासून आतापर्यंत ‘कर्नाटक बँक’ स्टॉकमध्ये 153 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

या शेअर्समध्ये ही मजबूत वाढ :
मागील वर्षीच्या होळीपासून आतापर्यंत ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स’ कंपंनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 145 टक्के परतावा कमावून दिला आहे. दरम्यान, ‘साऊथ इंडियन बँक’ च्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 136 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर युको बँकेच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 112 टक्के नफा मिळवून दिला आहे. याच काळात सेन्सेक्स मध्ये 3.36 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. तर निफ्टी-50 निर्देशांक 1.7 टक्क्यांनी वाढला आहे.

या शेअरने दिला 50-100 टक्के परतावा :
मागील वर्षाच्या होळीपासून आतापर्यंत कालावधीत पाच स्मॉल कॅप बँकिंग शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 50-100 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ‘इंडियन बँक’ च्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 86.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी ‘पंजाब अँड सिंध बँक’ शेअरने लोकांना 74.74 टक्के नफा मिळवून दिला आहे. ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’, ‘DCB बँक’, ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ या बँकिंग शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 50-100 टक्के परतावा कमावून दिला आहे.

एकूणच, या एक वर्षाच्या कालावधीत 32 स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दोन पट वाढवले आहे. यामध्ये ‘अपार इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने सर्वाधिक म्हणजेच 247 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर परतावा देण्याच्या बाबतीत ‘बीएलएस इंटरनॅशनल’ कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks from banking and finance sector has given huge profit 09 March 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(345)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x