25 January 2025 5:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह डिटेल्स जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, चॉइस इक्विटी ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 80 पैशाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 539835
x

Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार

Infosys Share Price

Infosys Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही ट्रेडिंग सेशनपासून आयटी निर्देशांकात कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यात इन्फोसिस या भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीचे शेअर्स देखील तेजी-मंदीच्या चक्रात अडकले आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीपासून 15 टक्के कमजोर झाले आहे. आज इन्फोसिस स्टॉकमध्ये किंचित खरेदी पाहायला मिळत आहे. ( इन्फोसिस अंश )

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 0.59 टक्के घसरणीसह 1483.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र मागील 7 ट्रेडिंग सेशनपासून हा स्टॉक सतत घसरत होता. इतकेच नाही तर शेअरची किंमत 1733 रुपये किंमतीवरून 1483 रुपये किमतीवर आली होती. काल गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.77 टक्के वाढीसह 1,495.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

जर आपण इन्फोसिस स्टॉकच्या दैनिक चार्टवर नजर टाकली तर आपल्याला समजेल की, हा स्टॉक 1480 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट तयार करत आहे. तज्ञांच्या मते जर हा स्टॉक या किंमत पातळीच्या वर टिकला तर शेअर अल्पावधीत पुन्हा आपली उच्चांक किंमत स्पर्श करू शकतो. इन्फोसिस स्टॉकने आपली 400 दिवसांची मूव्हिंग ॲव्हरेज किंमत पातळी स्पर्श केली आहे. साधारणतः तज्ञ 400 दिवसांची मूव्हिंग ॲव्हरेज किंमत पातळी फक्त शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढत असेल, तेव्हाच गृहीत धरतात.

मागील काही आठवड्यापासून इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने शॉर्ट सेलिंग पाहायला मिळत आहे. जर या स्टॉकने आपल्या सपोर्ट झोनवर थोडी सकारात्मकता दाखवली तर इन्फोसिस स्टॉक अल्पावधीत 1520 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. सध्या शेअर बाजारातील 23 तज्ञांनी इन्फोसिस स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर 8 तज्ञांनी हा आयटी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 29 March 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(83)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x