5 May 2024 6:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

SREI Infrastructure Finance Share Price | 2 रुपयाचा पेनी शेअर, याच कंपनीचं सरकारी कंपनी अधिग्रहण करणार, स्टॉक खरेदी करावा

SREI Infrastructure Finance Share Price

SREI Infrastructure Finance Share Price | एसआरईआय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.77 टक्के वाढीसह 2.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होण्याचे कारण म्हणजे, भारत सरकार समर्थित ‘नॅशनल अॅसेट कन्स्ट्रक्शन लिमिटेड’ कंपनीने SREI इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. कर्जात बुडलेल्या ‘SREI इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स’ कंपनीच्या स्टॉकने मागील काही वर्षांपासून आपल्या शेअर धारकांना वैताग देऊन ठेवला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | SREI Infrastructure Finance Share Price | SREI Infrastructure Finance Stock Price | BSE 523756 | NSE SREINFRA)

मागील पाच वर्षात हा शेअर 97 टक्के कमजोर झाला आहे. 27 एप्रिल 2018 रोजी या शेअरची किंमत 92.30 रुपयांवर पोहचली होती. तर आता हा स्टॉक 2.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. याचा अर्थ हा स्टॉक मागील 5 वर्षांत 97 टक्के घसरला आहे. मागील एका वर्षात या शेअरची किंमत 5.55 रुपयांवरून 2.65 रुपयांवर आली असून याकाळात शेअर 52 टक्के पडला आहे. पाच वर्षांपूर्वी SREI इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीचे शेअर्स 26.19 टक्के वाढले होते.

डीलचे संपूर्ण तपशील :
भारत सरकार समर्थित ‘नॅशनल अॅसेट कन्स्ट्रक्शन लिमिटेड’ कंपनीने दिवाळखोरी प्रक्रिये अंतर्गत SREI समूहातील ‘SREI इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड’ आणि ‘SREI इक्विपमेंट फायनान्स लिमिटेड’ या दोन कंपन्यांसाठी बोली लावली होती. कंपनीच्या कर्जदारांच्या समितीने बुधवारी NARCL ने सादर केलेल्या खरेदी योजनेला मंजुरी दिली असून यामध्ये, 5,555 कोटी रुपयांची निव्वळ नवीनतम किंमत म्हणजेच बोली ऑफर जाहीर करण्यात आली आहे. कंपनीच्या सत्यापित कर्जदारांपैकी 89.2 टक्के लोकांनी NARCL च्या खरेदी ऑफरच्या बाजूने मतदान केले आहे.

ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्राला कंपनीच्या 5,526 कोटी रुपयांच्या बोलीला 84.86 टक्के मते मिळाली. तर वर्दे पार्टनर्स अँड एरिना इन्व्हेस्टर्स यांच्या युतीने जाहीर केलेल्या 4680 कोटी रुपये बोलीला फक्त नऊ टक्के मते मिळाली होती. चॅलेंज मेकॅनिझमची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या तिन्ही बोली SREI कंपन्यांसाठी प्राप्त झाल्या होत्या. SREI Infra Finance आणि SREI Equipment Finance कंपनीचे संचालक मंडळ ऑक्टोबर 2021 रोजी रिझर्व्ह बँकेतर्फे व्यवसाय वर्तनातील त्रुटी आणि देय चुकांमुळे बरखास्त करण्यात आले होते. या कंपन्यांविरुद्ध दिवाळखोरीची कार्यवाही सुरू करण्यासाठी स्टॉक मार्केट नियामक सेबीने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजेच NCLT कोलकाता येथे अर्ज सादर केला होता. आणि आता त्यावर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SREI Infrastructure Finance 523756 SREINFRA stock market live on 17 February 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x