8 May 2024 2:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा? IRFC Vs IREDA Share Price | PSU शेअर्स तुफान तेजीत धावणार? IRFC आणि IREDA स्टॉकची जोरदार खरेदी सुरु GTL Share Price | स्वस्त GTL शेअर रॉकेट तेजीने धावणार, कंपनीकडून सकारात्मक बातमी आली, किती फायदा? Suzlon Share Price | सुझलॉन शेअर लोअर रिस्क आणि हाय रिवॉर्ड झोनमध्ये, ही आहे पुढची टार्गेट प्राईस Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार? PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा
x

BHEL Share Price | या सरकारी मालकीच्या कंपनीची लेटेस्ट रेटिंग जाहीर, शेअर 39 रुपये किमतीवर जाऊ शकतो

BHEL Share Price

BHEL Share Price | ‘BHEL’ कंपनीला ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीजकडून दणका मिळाला आहे. जेफरिजने BHEL कंपनीच्या स्टॉकवर ‘अंडरपरफॉर्म रेटिंग’ दिली आहे. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी BHEL कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 74.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज हा स्टॉक 75.30 रुपये किमतीवर ओपन झाला होता, आणि सध्या स्टॉक लाल निशाणीवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Bharat Heavy Electricals Share Price | Bharat Heavy Electricals Stock Price | BSE 500103 | NSE BHEL)

जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने सरकारी मालकीच्या BHEL कंपनीचे रेटिंग अंडरपरफॉर्मर असे केले आहे. यासोबतच जेफरीजने BHEL स्टॉक 39 रुपये किमतीवर जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे मॉर्गन स्टॅनलीनेही स्टॉकची रेटिंग कमी केली आहे. मॉर्गन स्टॅनली या जागतिक ब्रोकरेज हाऊसने BHEL कंपनीचे शेअर्स 34 रुपये किमतीवर जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. याचा अर्थ पुढील काळात BHEL कंपनीचे शेअर्स खाली येऊ शकतात.

BHEL कंपनी 5900 कोटी रुपये कमाई करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात कंपनीने फक्त 5263 कोटी रुपयांची कमाई केली. कंपनीच्या खर्चात झालेली वाढ यामुळे कंपनीची कामगिरी कमजोर झाली आहे. त्याचवेळी BHEL कंपनीच्या औद्योगिक विभागाच्या उत्पन्नात 21 टक्के आणि मार्जिनमध्ये 3.5 टक्केची वार्षिक घट झाली आहे. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 9.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत BHEL कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 22.98 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 91.55 रुपये होती. तर शेअरची नीचांक किंमत पातळी 41.40 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bharat Heavy Electricals Share Price 500103 BHEL stock market live on 03 March 2023.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x