19 May 2024 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Sintex Industries Share Price | या शेअरची किंमत फक्त 2 रुपये 21 पैसे, मुकेश अंबानी ही कंपनी खरेदी करणार, डिटेल्स पहा

Sintex Industries Share Price

Sintex Industries Share Price | ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ‘राहुल अरुणप्रसाद पटेल’ यांची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने म्हणजेच एनसीएलएटीने फेटाळली आहे. या याचिकेत पटेल यांनी ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ या कर्जबाजारी कापड कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्याविरोधात आव्हान केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Sintex Industries Share Price | Sintex Industries Stock Price | BSE 502742)

NCLAT चे आदेश :
NCLAT ने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल म्हणजेच NCLT च्या अहमदाबाद खंडपीठाने दिलेला आदेश जसाचा तसा कायम ठेवला आहे. 6 एप्रिल 2021 रोजी NCLT खंडपीठाने Invesco मालमत्ता व्यवस्थापन इंडिया फर्मच्या याचिकेवर सुनावणी देताना ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनी विरुद्ध कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला होता. NCLAT ने म्हटले की, न्यायाधिकरणाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याचा कोणताही महत्वाचा कारण आम्हाला दिसत नाही. आणि त्यामुळे 6 एप्रिल 2021 रोजी न्यायिक प्राधिकरणाने दिलेल्या आदेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे हा अपील फेटाळण्यात आला आहे.

मुकेश अंबानींनी बोली जिंकली :
‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनीची कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणि मुकेश अंबानींच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ आणि ‘अॅसेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइझ’ फर्मने ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनीवर लावलेली बोली जिंकली आहे. या दोन्ही कंपनीच्या एकत्रित बोलीला शेअर धारक आणि कर्जदाराकडून 98.88 टक्के मते प्राप्त झाली आहेत. ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या रिझोल्यूशन प्लॅनला एनसीएलटीने 10 फेब्रुवारी 2023 रोजी मान्यता दिली होती.

शेअरची कामगिरी :
सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 2.21 रुपये किमतीवर आले आहेत. 2008 मध्ये या कंपनीचे शेअर्स 280 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर या स्टॉकमध्ये जवळपास 99 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. सध्या या कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग बंद आहे. कंपनीची शेअर्स ट्रेडिंग प्रक्रियात्मक कारणांमुळे निलंबित केली आहे. कंपनीवर सध्या 7500 कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sintex Industries Share Price 502742 stock market live on 06 March 2023.

हॅशटॅग्स

#Sintex Industries Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x