16 May 2024 10:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

ArunJyoti Bio Ventures Share Price | मार्ग श्रीमंतीचा! तब्बल 372% परतावा देणारा शेअर पुन्हा अप्पर सर्किटमध्ये, कमाईसाठी डिटेल्स वाचा

ArunJyoti Bio Ventures Share Price

ArunJyoti Bio Ventures Share Price | ‘अरुण ज्योती बायो व्हेंचर्स लिमिटेड’ कंपनी 2 वेगवेगळ्या राज्यांमध्ये 2 बेव्हरेज प्लांट्स सुरू करणार आहे. ही बातमी जाहीर होताच कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘अरुण ज्योती बायो व्हेंचर्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 143.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘अरुण ज्योती बायो व्हेंचर्स’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये 2 बेव्हरेज प्लांट सुरू करणार आहे. ही माहिती सेबीला 8 मार्च 2023 रोजी कळवण्यात आली आहे.

निराशाजनक मासिक कामगिरी :
गेल्या महिन्यात ‘अरुण ज्योती बायो व्हेंचर्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने काही खास कामगिरी केली नाही. या कालावधीत कंपनीच्या शेअरची किंमत 3.87 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. तथापि कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 247.33 टक्क्यांनी वधारली आहे. तर एक वर्षभरापूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरवर पैसे लावले होते, त्यांना आता 372 टक्के परतावा मिळाला आहे.

‘अरुण ज्योती बायो व्हेंचर्स लिमिटेड’ या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 28.27 कोटी रुपये आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 148 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 19.60 रुपये होती. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीने निव्वळ उत्पन्नात वार्षिक आधारावर 231.31 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ArunJyoti Bio Ventures Share Price on 10 March 2023.

हॅशटॅग्स

ArunJyoti Bio Ventures Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x