
Magellanic Cloud Share Price | ‘मॅगेलॅनिक क्लाउड’ या स्मॉलकॅप आयटी कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. या IT कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक एका शेअरवर 4 बोनस शेअर मोफत देणार आहे. मॅगेलेनिक क्लाउड कंपनीच्या संचालक मंडळाने बुधवार दिनांक 22 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. ‘मॅगेलॅनिक क्लाउड’ कंपनीचे बाजार भांडवल 1559 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘मॅगेलॅनिक क्लाउड’ या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 582.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांत 1 लाखावर 14 लाख रुपये रिटर्न्स :
12 नोव्हेंबर 2021 रोजी ‘मॅगेलॅनिक क्लाउड’ कंपनीचे शेअर्स 38.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 10 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 582.85 रुपयांवर पोहचले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 1327 टक्के परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही नोव्हेंबर 2021 मध्ये ‘मॅगेलेनिक क्लाउड’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर,, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 14.26 लाख रुपये झाले असते.
सुरुवातीपासून आत्तापर्यंत 13770 टक्के परतावा :
‘मॅगेलॅनिक क्लाउड’ कंपनीच्या शेअर्सनी सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 13770 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 22 जानेवारी 2015 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर या आयटी कंपनीचे शेअर्स 4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बीएसई इंडेक्सवर 9 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 555.10 रुपयांवर पोहचले होते. जर तुम्ही ‘मॅगेलॅनिक क्लाउड’ कंपनीच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या काळात 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.38 कोटी रुपये झाले असते. ‘मॅगेलॅनिक क्लाउड’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 270.50 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.