27 April 2024 3:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत
x

Karnataka Assembly Election 2023 | कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमतासह 140 पेक्षा जास्त जागा मिळतील - सर्व्ह रिपोर्ट

Karnataka Assembly Election 2023

Karnataka Assembly Election 2023 | आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकूण २२४ जागांपैकी १४० पेक्षा जास्त जागा मिळतील. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी हा दावा पक्षांतर्गत केलेल्या एका सव्हे रिपोर्टनंतर केला. आगामी काळात सत्ताधारी भाजपचे अनेक विद्यमान आमदार काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असेही ते म्हणाले. कर्नाटकातील भाजपच्या नेत्यांना सत्ता जाण्याची चुणूक लागल्याने अनेक नेते भाजपाला सोडचिट्टी देतं असल्याचंही पाहायला मिळतंय.

भाजपच्या तीन दिग्गज नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
भाजपचे दोन माजी आमदार आणि म्हैसूरचे माजी महापौर यांचा पक्षात समावेश केल्यानंतर डीके शिवकुमार पत्रकारांशी बोलत होते. भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या तीन नेत्यांमध्ये कोल्लेगाळ्याचे माजी आमदार जी. एन. नानजुंदास्वामी आणि विजापूरचे माजी आमदार मनोहर ऐनापूर यांच्यासह म्हैसूरचे माजी महापौर पुरुषोत्तम यांचा समावेश आहे.

गुजरातपाठोपाठ कर्नाटकातही भाजपला लगेच निवडणुका हव्या होत्या
२०२२ च्या गुजरात निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच भाजपला कर्नाटकात निवडणुका घ्यायच्या होत्या, पण त्यांनी या निर्णयापासून माघार घेतली, असा दावाही शिवकुमार यांनी केला. याचं कारण म्हणजे भाजपला वाटतं की जेवढे जास्त दिवस मिळतील तेवढे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. निवडणुका तातडीने झाल्या तरी काँग्रेस त्यासाठी सज्ज आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा तातडीने जाहीर कराव्यात.

नेत्यांचा बिनशर्त काँग्रेसमध्ये प्रवेश
शिवकुमार पुढे म्हणाले की, माजी आमदार भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. येत्या काही दिवसांत आम्ही प्रवेश करणाऱ्या विद्यमान आमदारांची यादीही जाहीर करणार आहोत. त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मी सध्या कोणाचेही नाव उघड करणार नाही. ते म्हणाले की, नेते कोणत्याही अटीशिवाय कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत आणि पक्षाची विचारधारा आणि नेतृत्व स्वीकारत आहेत. जनमत काँग्रेसच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसला 140 पेक्षा जास्त जागा मिळतील
“आमच्या आधीच्या सर्व्हेमध्ये आमच्या जागा 136 जागांवर असल्याचा अंदाज होता, आता आमच्या सर्व्हेमध्ये ती 140 जागांहून अधिक असल्याचा रिपोर्ट आहे. बदल सुरू झाला आहे. तो राज्यभर फिरताना आपण पाहत आहोत असं देखील ते म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Karnataka Assembly Election 2023 survey report check details on 12 March 2023.

हॅशटॅग्स

#Karnataka Assembly Election 2023(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x