
Yes Bank Share Price | 14 मार्च 2023 रोजी येस बँकेचे शेअर 0.64 टक्के घसरणीसह 15.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज स्टॉक मध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. येस बँकेच्या शेअरमध्ये ही घसरण होण्याचे कारण म्हणजे बँकेच्या शेअरचा तीन वर्षांचा लॉक इन कालावधी 13 मार्च रोजी संपला आहे. त्यामुळे स्टॉक मध्ये विक्रीचा दबाव वाढला आहे. मात्र येस बँकेच्या शेअर्समध्ये अजून लोअर सर्किट लागलेला नाही, याचा अर्थ सेलिंगसाठी जेवढे शेअर्स ऑर्डर बुक मध्ये आहेत, त्यांची खरेदी देखील होत आहे.
येस बँकेतील गुंतवणुकदार :
जेव्हा येस बँक आर्थिक संकटात सापडली होती, त्यावेळी आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, कोटक महिंद्रा बँक, फेडरल बँक, यांनी येस बँकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून तिला वाचवले होते. या सर्व गुंतवणूकदारांचा लॉक इन कालावधी 13 मार्च 2023 रोजी संपला आहे. आता मात्र हे सर्व गुंतवणूकदार येस बँकेचे शेअर्स विकून प्रॉफिट बुक करत आहेत. जेव्हा या बँकांनी येस बँकेत गुंतवणूक केली होती, तेव्हा शेअरची किंमत 10 रुपये होती.
स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
येस बँकेच्या तीन वर्षांचा लॉक इन कालावधी संपला आहे. प्रॉफिट मार्ट सिक्युरिटीज फर्मचे तज्ञ म्हणतात की, तीन वर्षांचा लॉक इन कालावधी संपला असून येस बँकेत आता किरकोळ गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढेल. लॉक इन कालावधी संपल्यानंतर या सर्व बँका येस बँकेतील शेअर्स विकून प्रॉफिट बुक करत आहेत. त्यामुळे स्टॉकमध्ये कालपासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. हे शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांकडून अधिग्रहण केले जातील अशी अपेक्षा आहे.
येस बँक शेअर लक्ष्य किंमत :
आनंद राठी फर्मचे तज्ञ म्हणतात की, ज्यां गुंतवणूकदारांनी येस बँक शेअर मध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांनी 15 रुपये स्टॉप लॉस लावून स्टॉक होल्ड करावा असा सल्ला दिला आहे. जर शेअरची किंमत 15 रुपये किंमत तोडून खाली आली तर 12 ते 13 रुपयांवर खरेदी करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. अल्पावधीत हा शेअर 20 ते 22 रुपये किंमत स्पर्श करू शकतो असे तज्ञ म्हणातात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.