29 April 2024 8:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Stocks To Buy | गुंतवणुकीवर 42 टक्के पर्यंत परतावा हवा आहे? हे शेअर्स करतील मालामाल, लिस्ट सेव्ह करा

Stocks To Buy

Stocks To Buy | शेअर बाजारात सध्या खूप अस्थिरता आहे. असा वेळी कोणते शेअर्स खरेदी करावे याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून शेअर बाजारातील तज्ञांनी काही लार्ज कॅप स्टॉक्स निवडले आहेत, जे पुढील काळात चांगला परतावा देऊ शकतात. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी असे काही शेअर्स निवडले आहेत, जे पुढील काळात 42 टक्के वाढू शकतात. मोतीलाल ओसवाल UPL, Zomato, SBI Life Insurance, LIC, FSN ई – कॉमर्स म्हणेजच नायका स्टॉक बाबत सकारात्मक आहे. तसेच तज्ञांनी जेएसडब्ल्यू एनर्जी, श्री सिमेंट, एबीबी, कमिन्स इंडिया, हे शेअर्स पुढील काळात घसरतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

मोतीलाल ओसवाल फर्मचा अंदाज :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ज्ञांच्या मते यूपीएल कंपनीचे शेअर्स पुढील काळात 42 टक्के पर्यंत वाढू शकतात. हा स्टॉक मागील एक वर्षभरापासून सुस्त पडला आहे, मात्र पुढील काळात त्यात वाढ होऊ शकते. त्याच वेळी झामॅटो कंपनीच्या स्टॉकमध्ये पुढील काळात 77 टक्के वाढ होऊ असे तज्ञ म्हणतात. मागील एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 30 टक्क्यांनी कमजोर झाले आहे.

मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी SBI लाइफ इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स 67 टक्के वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांनी वर गेले आहेत. मोतीलाल ओसवाल फर्मने स्टॉक ची पूर्ण लिस्ट जाहीर करून स्टॉक मधील वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात खालील शेअर्स सामील आहेत.

* LIC : 80 टक्के,
* Nykaa : 35 टक्के,
* ICICI प्रुडेन्शियल लाइफ : 35 टक्के,
* मॅक्रोटेक : 34 टक्के,
* अक्सिस बँक : 30 टक्के.

दरम्यान मोतीलाल ओसवाल फर्म च्या तज्ञांना काही स्टॉकमध्ये कमजोरी येण्याचे संकेत दिसत आहेत. जेएसडब्ल्यू एनर्जी हा स्टॉक टॉप नकारात्मक शेअरपैकी एक आहे. पुढील काळात यात 23 टक्के घसरण होण्याची शक्यता आहे. याशिवाय श्री सिमेंट कंपनीचे शेअर्स 10 टक्के कमजोर होऊ शकतात. तर ABB, कमिन्स इंडिया, पॉलीकंब इंडिया, सीमेन्स कंपनीचे शेअर्स देखील नकारात्मक संकेत देत आहेत. कमिन्स इंडिया आणि एबीबी कंपनीच्या शेअर मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 78 टक्के आणि 58 टक्के परतावा कमावून दिला आहे. सीमेन्स कंपनीच्या शेअरने 46 टक्के आणि पॉलीकॅप इंडिया कंपनीच्या शेअरने 38 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy recommended by Motilal Oswal brokerage firm details on 14 March 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(279)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x