 
						Voltamp Transformers Share Price | बऱ्याच काळापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करणाऱ्या ‘व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स’ या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये आज तेजी पाहायला मिळत आहे. ही कंपनी मुख्यतः जड विद्युत उपकरणे बनवण्याचा व्यापार करते. डोमेस्टिक ब्रोकरेज हाऊस आणि रिसर्च फर्म ‘ICICI सिक्युरिटीज’ ने ‘व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स’ कंपनीच्या शेअरवर संशोधन करून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात ब्रोकरेज हाऊसने ‘व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स’ कंपनीच्या शेअर्सला ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करायचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 3600 रुपयांवर जाऊ शकतात. बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी ‘व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स’ कंपनीचे शेअर्स 1.66 टक्के वाढीसह 2,760.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3686 होती. (Voltamp Transformers Limited)
स्टॉकची लक्ष किंमत :
ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजच्या मते, मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आणि बॅलन्स शीटवर लक्ष केल्यामुळे व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स कंपनीच्या आर्थिक सुधारणा होऊ शकते. ब्रोकरेज हाऊसने ‘व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स’ कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग दिली असून त्यावर 3,610 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. ब्रोकरेज हाऊसच्या मते, ‘व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स’ ही कंपनी ट्रान्सफॉर्मर सेक्टरमधील एक अग्रणी कंपनी असून देशांतर्गत बाजारात कंपनीचा वाटा 15 टक्के आहे.
3 वर्षांत 225 टक्के परतावा :
‘व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स’ कंपनीच्या शेअर्सनी 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 225 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 833.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 2760 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 41 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ‘व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1728.50 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		