3 May 2024 10:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा
x

RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजी-मंदीला सामोरे जात आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 0.89 टक्क्यांच्या घसरणीसह 257.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच आरव्हीएनएल कंपनीला 440 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

या ऑर्डरची पूर्तता 30 महिन्यांत करायची आहे. आरव्हीएनएल कंपनीने दक्षिण मध्य रेल्वेच्या निविदासाठी सर्वात कमी बोली लावली होती. शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.73 टक्के घसरणीसह 258 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

रेल विकास निगम कंपनीला औरंगाबादमध्ये विद्युतीकरण आणि सिग्नलिंग कामांसह, अंकाई स्टेशन आणि करंजगाव स्थानकांदरम्यान प्रस्तावित ट्रॅक दुहेरीकरणासाठी ईपीसी कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. या कंपनीने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे ट्रॅक दुहेरीकरण प्रकल्प देखील हाती घेतले आहे. सध्या आरव्हीएनएल कंपनीची ऑर्डर बुक मजबूत स्थितीत आहे. कंपनीचे अनेक प्रकल्प देशभरात प्रलंबित आहेत. त्यामुळे या सरकारी कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांचा जास्त विश्वास आहे.

आरव्हीएनएल कंपनीकडे सध्या देशांतर्गत ऑर्डरमध्ये प्रस्तावित करंजगाव स्टेशन येथील ट्रॅकचे दुहेरीकरणाचे काम आहे. आणि अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम संबंधित देखील अनेक प्रकल्प कंपनीकडे प्रलंबित आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 234.63 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53.34 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 20 April 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x