12 May 2024 11:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641 Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
x

२००४ व २०१४ मध्ये शपथपत्रात शिक्षण पदवीधर; तर २०१९ मध्ये पदवीधर नाही?

Smriti Irani, Narendra Modi, BJP

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं शिक्षण, त्यांची पदवी नेहमीच वादात आणि चर्चेचा विषय राहिली. ५ वर्षांपूर्वी इराणी यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हा इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून गदारोळ निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आपण परदेशातील येल विद्यापठातून ग्रॅज्युएट असल्याचं स्मृती यांनी अनेकवेळा जाहीरपणे सांगितलं होतं. परंतु आता लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी वेगळीच माहिती दिली आहे. आपण ग्रॅज्युएशन पूर्ण न केल्याचं त्यांनी शपथपत्रात नमूद करत स्वतःच्या पदवीचा वाद कायमचा संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

आपण दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून बीकॉमची प्रथम वर्षाची परीक्षा दिली. परंतु, ३ वर्षांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंच नाही, अशी माहिती इराणी यांनी शपथपत्रातून नमूद केली आहे. पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण न केल्याची माहिती खुद्द इराणी यांनी दिल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे. इराणी यांनी २००४ आणि २०१४ मध्ये निवडणूक अर्ज दाखल करताना वेगवेगळी माहिती दिली होती. त्यामुळे त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री झाल्यानंतर त्यांच्यावर शिक्षणावर टीका झाली होती.

२००४ मध्ये इराणी यांनी चांदणीचौक मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळो आपण बीए’पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिली होती. दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून आपण बीए केल्याचं त्यांनी शपथपत्रात नमूद केलं होतं. पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x