
SAIL Share Price | ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया’ म्हणजेच भारत सरकारच्या मालकीच्या SAIL कंपनीसह तीन इतर कंपन्यांनी भारतीय रेल्वेकडे चाक निर्मिती कारखाना उभारण्यासाठी निविदा सादर केल्या आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशन दरम्यान ही बातमी येताच कंपनीचे शेअर्स किंचित तेजीत आले होते. गुरुवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.14 टक्के घसरणीसह 84.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजार जागतिक नकारात्मक भावनांमुळे कमजोर होता, मात्र या स्टील कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. या करारांतर्गत सेल कंपनी पुढील 20 वर्ष दरवर्षी भारतीय रेल्वेला विविध प्रकारचे 80,000 चाकांचा पुरवठा करणार आहे. (Steel Authority of India Ltd)
पुण्यातील ‘भारत फोर्ज’ आणि कोलकातास्थित ‘रामकृष्ण फोर्जिंग्स’ या दोन्ही कंपन्यांनी देखील उत्पादन प्रकल्प उभारण्यात स्वारस्य दाखवले आहे. ही माहिती भारतीय रेल्वेने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात जाहीर केली आहे. भारतीय रेल्वेने आपले आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पुढील 20 वर्षांपर्यंत दरवर्षी 80,000 चाकांचा पुरवठा करण्यासाठी देशात उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना आखली होती. आणि त्यासाठी भारतीय रेल्वेने निविदा मागवल्या होत्या. त्याला प्रतिसाद म्हणून सेल, भारत फोर्ज, आणि रामकृष्ण फोर्जिंग्ज यांनी निविदा सादर केल्या. रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीच्या शेअर्समध्ये देखील सहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली होती.
भारतीय रेल्वेने आयात कमी करण्यासाठी आणि ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला हातभार लावण्यासाठी भारतात एक उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना आखली होती. ही निविदा प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि स्पर्धात्मक पणे पूर्ण झाली. 24 जानेवारी 2023 रोजी भारतीय रेल्वेने निविदा जाहीर केली होती. यात रामकृष्ण फोर्जिंग कंपनीने सर्वात कमी बोली लावली आहे. त्यानंतर भारत फोर्ज आणि सेलचा क्रमांक लागतो. सध्या सेल लिमिटेड सरासरी 1,87,000 रुपये प्रति टन दराने पुरवठा करु शकते.
SAIL लिमिटेड कंपनीची सध्याची देशांतर्गत उत्पादन क्षमता 40,000 चाकांची आहे. RINL कंपनीची उत्पादन क्षमता 80,000 चाकांची आहे. अशा प्रकारे एकत्रित एकूण उत्पादन क्षमता 1.20 लाख चाक पर्यंत जाते. 2022-23 या आर्थिक वर्षात रेल्वेने चीन आणि रशियाकडून 520 कोटी रुपये किमतीची 80,000 चाके मागवली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.