4 May 2024 1:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

Gold Price Today | आज सोन्याच्या किंमतीत जोरदार हालचाली, आताच खरेदी केल्यास फायद्यात रहाल, आजचे नवे दर तपासा

Gold Price Today

Gold Price Today | गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीला तेजीचा विक्रम करणाऱ्या सोने-चांदीतही या महिन्याच्या अखेरीस मोठी घसरण पाहायला मिळाली. पण पुन्हा एकदा दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सोन्याने 58,500 रुपये आणि चांदीने 71,000 रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. पण त्यानंतर सोन्यात ३० रुपयांहून अधिक आणि चांदीमध्ये सुमारे ८००० रुपयांची घसरण झाली.

सोन्याचा भाव 65,000 पर्यंत जाण्याचा अंदाज
यंदाच्या दिवाळीत सोने-चांदीच्या दरात प्रचंड वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सोन्याचे दर 65,000 रुपये प्रति १० ग्राम आणि चांदीचे दर ८०,००० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांत ५८,५०० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलेले सोने पुन्हा 58,000 रुपयांच्या आसपास पोहोचले आहे. चांदीनेही तेजी घेत ६७ हजार रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. जगभरातील बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदी दोन्ही अडचणीत सापडले आहेत.

एमसीएक्स वर दर घसरले
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून आली. मागील दिवसात ५८,० रुपयांच्या पुढे गेलेले सोने गुरुवारी ३६१ रुपयांच्या घसरणीसह ५७९७५ रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. गेल्या काही दिवसांत चांदीने ७१ हजारांचा टप्पा ओलांडला होता. गुरुवारी तो ५९८ रुपयांनी घसरून ६६७०१ रुपयांवर व्यवहार करताना दिसला. याआधी बुधवारी सोने 58336 रुपये आणि चांदी 67299 रुपये प्रति किलो वर बंद झाली होती.

सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, चांदीतही घसरण
सराफा बाजारात गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात संमिश्र तेजी दिसून आली. सोन्यात वाढ झाली असून चांदीत घसरण झाली आहे. इंडिया बुलियन असोसिएशनने (https://ibjarates.com) जाहीर केलेल्या किंमतीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 223 रुपयांनी वाढून 58115 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव 361 रुपयांनी घसरून 66500 रुपये किलो झाला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 16 March 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x