
Gold Price Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 58159 रुपयांवर खुला झाला आहे. त्याच वेळी, मागील व्यवहाराच्या दिवशी तो 58341 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचे दर 182 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडले आहेत. सध्या सोनं जवळपास 723 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता. तर चांदीचा भाव आज 66937 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी चांदीचा भाव 67311 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रतिकिलो ३७४ रुपयांची घसरण झाली आहे.
सोन्याच्या दरात मोठी वाढ होईल
काही दिवसांनी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. सोन्याचे दर ६५ हजार रुपये प्रति किलो आणि चांदीचे दर ८० हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता होती. जगभरातील बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदी दोन्ही अडचणीत सापडले आहेत.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली. सोन्याचे दर 246 रुपयांनी वाढून 58252 रुपयांवर आणि चांदी 723 रुपयांनी वाढून 67254 रुपयांवर पोहोचली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये गुरुवारी सोने 58,006 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 66,531 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
सराफा बाजारात घसरण
मात्र सराफा बाजारात शुक्रवारी घसरण दिसून आली. इंडिया बुलियन एसोसिएशनने जाहीर झालेल्या दरांनुसार, 24 कॅरेट सोने 182 रुपयांनी घसरून 58,159 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 374 रुपयांनी घसरून 66,937 रुपये प्रति किलो झाला.
तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर :
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५३८०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५८६९० रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 53830 रुपये, 24 कॅरेट सोने : 58690 रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५३८०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५८६९० रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 53830 रुपये, 24 कॅरेट सोने : 58690 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोना : 53800 रुपये, 24 कॅरेट सोना : 58690 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५३८०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५८६९० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५३८३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५८६९० रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 53800 रुपये, 24 कॅरेट सोने : 58690 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 53800 रुपये, 24 कॅरेट सोने : 58690 रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५३८३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५८६९० रुपये
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.