
Hariom Pipe Industries Share Price | ‘हरिओम पाईप इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये या कंपनीच्या शेअर्सने इंट्रा डे ट्रेडमध्ये 4.20 टक्क्यांच्या वाढीसह 483.15 रुपये किंमत स्पर्श केली होती. तर आज बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.68 टक्के वाढीसह 495.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. प्रेफ्ररंस शेअर्सच्या माध्यमातून कंपनीला निधी उभारण्याची मान्यता मिळाल्यानंतर स्टॉक तेजीत आला आहे. (Hariom Pipe Industries Limited)
14 मार्च 2023 रोजी ‘हरिओम पाईप इंडस्ट्रीज’ या लोह आणि पोलाद उत्पादन निर्मात्या कंपनीच्या स्टॉकने 468 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आता मात्र कंपनीने नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. मागील तीन महिन्यांत S&P BSE सेन्सेक्स इंडेक्समध्ये झालेल्या 5 टक्क्यांची पडझड झाली आहे, तर त्या तुलनेत ‘हरिओम पाईप इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स जवळपास 50 टक्क्यांनी वर गेले आहेत. मागील सहा महिन्यांत बेंचमार्क निर्देशांक 3 टक्क्यांनी घसरला आहे, तर त्या तुलनेत ‘हरिओम पाईप इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 80 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
गुंतवणूकीवर परतावा :
‘हरिओम पाईप इंडस्ट्रीज’ कंपनीचा IPO प्रति शेअर 153 रुपये किमतीवर लाँच झाला होता. आणि आता शेअरची किंमत 214 टक्के वाढली आहे. 13 एप्रिल 2022 रोजी ‘हरिओम पाईप इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर सूचीबद्ध झाले होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार शेअर धारकांनी 18 महिन्यांच्या कालावधीत 3.37 दशलक्ष वॉरंट इक्विटी शेअरमध्ये रूपांतरित करण्यासाठी आणि प्रत्येकी 10 रुपयांचे 2.14 दशलक्ष इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करण्याची मान्यता दिली आहे. यापूर्वी ‘हरिओम पाईप इंडस्ट्रीज’ कंपनीच्या संचालक मंडळाने 25 जानेवारी 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत 116.30 कोटी रुपये मूल्याचे वॉरंट जारी करून आणि इक्विटी शेअर्स 190.27 कोटी रुपये भांडवल उभारण्यास मान्यता दिली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.