5 May 2024 3:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Lemon Tree Hotels Share Price | कमाईची संधी! 73 रुपयांचा हा शेअर 50 टक्के परतावा देऊ शकतो, खरेदीपूर्वी डिटेल्स पहा

Lemon Tree Hotels Share Price

Lemon Tree Hotels Share Price | ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने ‘लेमन ट्री हॉटेल्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच तज्ञांनी शेअरची लक्ष्य किंमत 125 रुपयांवरून वाढवून 132 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. ‘लेमन ट्री हॉटेल्स’ कंपनीचे शेअर्स च्या सध्याच्या किमतीपेक्षा 79.35 टक्क्यांनी वाढू शकतात असे तज्ञ म्हणाले. आज सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी ‘लेमन ट्री हॉटेल्स’ कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के वाढीसह 73.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्मने ‘लेमन ट्री हॉटेल’ कंपनीच्या बाबतीत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीच्या महसुलात वार्षिक 100 टक्के आणि ऑपरेटिंग मार्जिनमध्ये 50 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता, जो तो पूर्ण होण्याच्या खूप जवळ आहे. (Lemon Tree Hotels Limited)

कोरोना महामारीनंतर हॉटेल उद्योगासाठी 2023 हे आर्थिक वर्ष पुनर्प्राप्तीचे आणि शाश्वत उद्योग विस्तार करण्याचे वर्ष आहे. आता आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये, उद्योग स्तरावर मागणीत 10 टक्के वाढ अपेक्षित आहे. ब्रोकरेज फर्मच्या अहवालनुसार, ही वाढ आर्थिक वर्ष 2023 आणि 2027 दरम्यान 4-5 टक्के CAGR पर्यंत जाऊ शकते. ICICI फर्मने सांगितले आहे की, ‘लेमन ट्री हॉटेल’ कंपनी मार्च 2025 पर्यंत आणखी 2,800 हॉटेल रूम्स जोडण्याचा प्लॅन करत आहे. त्यानंतर कंपनीकडील रूम्सची संख्या 11,000 होईल. ‘लेमन ट्री हॉटेल’ कंपनीचे कर्ज FY25 पासून ऑरगॅनिक पद्धतीने कमी करण्याची योजना तयार केली आहे. मुंबई विमानतळावरील हॉटेल बांधकामासाठी 500 कोटी रुपयांचा खर्च होणे अपेक्षित आहे.

ICICI सिक्युरिटीज ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, आर्थिक वर्ष 23-24 मध्ये कंपनीचा महसूल आणि EBITA अंदाज 18 टक्क्यांनी वाढेल. तसेच तज्ञ स्टॉक बाबत सकारात्मक असून त्यांनी शेअर्स 132 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. लेमन ट्री हॉटेल्स कंपनीने नुकत्याच संपलेल्या डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये सर्वोत्तम तिमाही निकाल जाहीर केले होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत ‘लेमन ट्री हॉटेल’ कंपनीने 620 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर या कालावधीत कंपनीने 310 कोटी रुपये ऑपरेटिंग प्रॉफिट कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lemon Tree Hotels Share Price BSE 541233 NSE LEMONTREE on 27 March 2023.

हॅशटॅग्स

#Lemon Tree Hotels Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x