10 May 2024 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | कमाईची मोठी संधी! सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, मल्टिबॅगर स्टॉक खरेदी करा Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉक डाऊनसाईड झोनच्या दिशेने? ब्रेकआऊट तोडल्यास रु.400 पार Patel Engineering Share Price | शेअर प्राईस 55 रुपये! स्वस्त शेअरला तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, स्टॉक तेजीत धावणार IPO GMP | आला रे आला IPO आला! ग्रे मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell? Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरने ब्रेकआउट तोडला, अल्पावधीत देणार मोठा परतावा, खरेदीचा सल्ला Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा
x

Indian Hotels Share Price | टाटा ग्रुपचा हा स्टॉक तुम्हाला श्रीमंत बनवणार, कंपनीचा व्यवसाय विस्तार तेजीत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

Indian Hotels Share Price

Indian Hotels Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीच्या शेअर मध्ये तेजीचे संकेत मिळत आहेत. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बैंक ‘UBS’ ने ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीच्या शेअरवर ‘BUY’ रेटिंग दिली आहे. त्याचवेळी तज्ञांनी स्टॉकसाठी 400 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीचे शेअर्स 2.26 वाढीसह 319.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 348.70 रुपये होती. (Indian Hotels Company Limited)

स्टॉक बाबत तज्ञांचे मत :
ग्लोबल इन्फ्हेस्टमेंट बैंक ‘UBS’ ने ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. यासह तज्ञांनी म्हंटले आहे की, डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीची कामगिरी मजबूत होती आणि चौथ्या तिमाहीत ही कंपनीची कामगिरी मजबूत राहील असा अंदाज आहे. ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल उत्कृष्ट होते. या तिमाहीत कंपनीने 1686 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, जो वार्षिक आधारावर 51 टक्के वाढला आहे. त्याच वेळी तिमाही आधारावर कंपनीच्या महसुलात 22.8 टक्के वाढ झाली आहे. वार्षिक आधारावर कंपनीचा EBITDA 85.6 टक्क्यांनी वाढला. मागील काही महिन्यांपासून ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीने आपल्या व्यवसाय विस्तारावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पुढील 24.28 महिन्यांत ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीने 40 हॉटेल्स लाँच करण्याची तयारी केली आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीच्या शेअर्सवर मागील काही काळापासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षाच्या कालावधीत ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 32.29 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांनी मागील 2 वर्षात 198 टक्के आणि मागील 3 वर्षात 325 टक्के नफा कमावला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3.78 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indian Hotels Share Price on 30 March 2023.

हॅशटॅग्स

#Indian Hotels Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x