3 May 2025 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL
x

Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजी! स्टॉक अनेक महिन्यापासून पडत होता, आता अचानक तेजी, नेमकं कारण काय?

Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price | बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उसळी पाहायला मिळाली. कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14.73 टक्के वाढीसह 8.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एक निवेदन जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या राइट्स इश्यू अंतर्गत थकबाकी असलेल्या शेअर्सचे पैसे भरले गेले आहेत. (Suzlon Energy Limited)

पूर्ण डिटेल :
‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीने सेबी माहितीत म्हंटले आहे की, कंपनीने 240,00,00,000 शेअर्स 2.50 रुपये प्रति इक्विटी शेअर्स या दराने आणि प्रत्येकी 1 रुपये अतिरिक्त पेमेंट पूर्ण केले आहे. हे शेअर्स 31 ऑक्टोबर 2022 रोजी राइट्स इश्यू अंतर्गत वाटप करण्यात आले होते. याशिवाय, कंपनीचे संचालक ‘गौतम दोशी’ यांचा कार्यकाळ आणखी तीन वर्षांच्या दुसऱ्या टर्मसाठी वाढवला आहे.

शेअरची कामगिरी :
मागील 15 वर्षांत ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 97 टक्के कमजोर झाले आहेत. या काळात शेअरची किंमत 390 रुपये वरून घसरुन सध्याच्या किंमतीवर आली आहे. म्हणजेच मागील पाच वर्षांत ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 26.95 टक्के कमजोर झाले आहे. तर YTD आधारे हा स्टॉक 24.77 टक्के कमजोर झाला आहे. काल एका दिवसात या कंपनीचे शेअर्स 14.18 टक्के वाढले, हे पाहून गुंतवणुकदार अक्षरशः हैराण झाले.

कंपनीची कामगिरी :
‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीत दुप्पट कमाई केली आहे. या काळात कंपनीच्या निव्वळ नफा दुप्पट झाला आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीने 78.28 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला जो मागील तिमाहीच्या तुलनेत दुप्पट आहे. कंपनीचा खर्च कमी झाला असल्याने नफ्यात ही वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीने 36.77 कोटी रुपये निव्वळ प्रॉफिट कमावला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीचे उत्पन्न मागील तिमाहीत 1,615 कोटी रुपयांवरून 1,464 कोटी रुपयांवर आले होते. तर या काळात कंपनीचा एकूण खर्चही 1,386 कोटी रुपयांवर आला जो एक वर्षभरापूर्वी याच तिमाही कालावधीत 1,573 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Energy Share Price on 30 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Suzlon Energy Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या