ICICI Bank Share Price | या बँकेची FD नव्हे तर शेअर श्रीमंत करतोय, 1 लाखावर दिला 98 लाख परतावा, खरेदी करावा?
ICICI Bank Share Price | आजकाल आपल्याकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बँका आपल्या ग्राहकांना एफडी, आरडी यासारखे पर्याय ऑफर करत असतात. परंतु या बँकेचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना एफडी आणि आरडी योजनेच्या तुलनेत अनेक पट अधिक परतावा कमावून देतात. बँकांच्या एफडी आणि आरडी मध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही मजबूत परतावा कमवू शकता. आयसीआयसीआय बँकेच्या स्टॉकमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांनी एफडी आणि आरडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांपेक्षा अधिक परतावा कमावला आहे. कसे? चला जाणून घेऊ सविस्तर तपशील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ICICI Bank Share Price | ICICI Bank Stock Price | BSE 532174 | NSE ICICIBANK)
सुरुवातीपासून आतपर्यंत परतावा :
ICICI बँकेचा स्टॉक सप्टेंबर 1997 शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. 26 सप्टेंबर 1997 पासून आतापर्यंत या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 9,771.26 टक्के परतावा कमावून दिला आहे. ICICI बँकेचा स्टॉक बीएसई इंडेक्सवर 26 सप्टेंबर 1997 रोजी 9.36 रुपयांवर ट्रेड करत होता. आज या स्टॉकची किंमत 923.95 रुपयांवर गेली आहे. या कालावधीत ICICI बँकेच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांचे पैसे जवळपास 98 पट अधिक वाढवले आहेत. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांचे गुंतवणूक मूल्य आता वाढून 98.71 लाख झाले आहेत.
मागील 5 वर्षाचा परतावा :
आयसीआयसीआय बँकेच्या शेअरने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. 08 डिसेंबर 2017 पासून आतापर्यंत या शेअरने आपल्या शेअर धारकांना 197.52 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 08 डिसेंबर 2017 रोजी NSE इंडेक्सवर ha बँकिंग स्टॉक 310.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या या स्टॉकची किंमत 923.95 रुपये किमतीवर गेली आहे. ICICI बँकेच्या शेअरने या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास 3 पट अधिक वाढवले आहेत. त्यामुळे 1 लाख रुपये लावणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे अल्पावधीत वाढून 2.97 लाख रुपये झाले आहेत.
उर्वरित कालावधीचा परतावा :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयसीआयसीआय बँकेचा शेअर 0.23 टक्क्यांच्या वाढीसह हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होता. मागील 5 दिवसांत या स्टॉकमध्ये 2.99 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. 1 महिन्यात शेअरची किंमत 1.40 टक्क्यांनी वधारली आहे. ICICI बँकेच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 6 महिन्यांत 26.66 टक्के अधिक कमाई करून दिली आहे. 2022 या वर्षात हा स्टॉक 20.82 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात स्टॉकची किंमत 22.64 टक्के अधिक वाढली आहे.
बाजार भांडवल :
ICICI बँकेचे मार्केट कॅप 6.44 लाख कोटी रुपये आहे. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 958 रुपये आहे, तर नीचांक किंमत पातळी 642 रुपये होती.
ICICI बँकेबद्दल थोडक्यात :
ICICI बँक लिमिटेड ही भारतातील सर्वाधिक शाखा असणारी खाजगी बँक आहे. बँकेचे मुख्यालय मुंबई शहरात स्थित आहे. ही बँक कॉर्पोरेट आणि किरकोळ ग्राहकांना गुंतवणूक बँकिंग, लाइफ, नॉन-लाइफ इन्शुरन्स, व्हेंचर कॅपिटल आणि अॅसेट मॅनेजमेंट या क्षेत्रातील अनेक डिलिव्हरी चॅनेल आणि आपल्या विशेष उपकंपन्यांद्वारे बँकिंग उत्पादने आणि वित्तीय सेवा प्रदान करण्याचे कार्य करते. या बँकेचे संपूर्ण भारतात एकूण 5,275 शाखा आणि 15,589 एटीएम कार्यरत आहेत. बँकेचे एकूण 17 देशांमध्ये काम चालू आहे. युनायटेड किंगडम आणि कॅनडामध्ये ICICI बँकेच्या उपकंपन्या काम करत आहेत. अमेरिका, सिंगापूर, बहारीन, हाँगकाँग, कतार, ओमान, दुबई इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, चीन आणि दक्षिण आफ्रिका येथेही ICICI बँकेने आपल्या शाखा सुरू केल्या आहेत. त्याचप्रमाणे UAE, बांगलादेश, मलेशिया आणि इंडोनेशिया येथे बँकेचे प्रतिनिधीक कार्यालये कार्यरत आहेत. ICICI बँक कंपनीच्या UK स्थित उपकंपनीने बेल्जियम आणि जर्मनीमध्येही आपल्या शाखा सुरू केल्या आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | ICICI Bank Share Price 532174 ICICIBANK in focus check details on 01 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News