6 May 2024 1:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

#आयपीएल२०१९ - पंजाबचा राजस्थानवर १२ धावांनी विजय

Mumbai Indian, IPL 2019

मोहाली : मोहालीच्या मैदानावर अटीतटीच्या लढतीत अखेर पंजाबने राजस्थानवर १२ धावांनी मात केली. राहुलचे अर्धशतक आणि मिलरची फटकेबाज खेळीच्या जोरावर पंजाबने राजस्थानपुढे १८३ धावांचे आव्हान ठेवले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १७० धावांपर्यंतच मजल मारू शकला. स्टुअर्ट बिन्नीने शेवटच्या टप्प्यात ११ चेंडूत ३१ धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले.

आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील राजस्थान-पंजाब लढतीत प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबने २० षटकांत १८२ धावांची मजल मारली. सलामीवीर राहुल ५२ आणि डेव्हीड मिलर ४० धावा यांच्या दमदार फलंदाजीमुळे पंजाबला १८० धावांचा पल्ला पार करता आला. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम पंजाबला फलंदाजी दिली. सुरुवातीला त्याचा निर्णय फायदेशीर ठरला. धोकादायक गेलला आर्चरने ३० धावांवर बाद करून राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर गेलची जागा घेणारा मयांक अगरवालदेखील फार काळ टिकला नाही. त्याला सोढीने २६ धावांवर बाद करून राजस्थानला दुसरे यश मिळवून दिले. पण त्यानंतर राहुल-मिलर जोडी जमली. यांनी तिसर्‍या विकेटसाठी ८५ धावांची भाागिदारी करून पंजाबचा डाव सावरला. अखेर राहुलला उडानकटने ५२ धावांवर बाद करून ही जोडी फोडली.

त्यानंतर आलेला मनदीप सिंग आणि यष्टीरक्षक पुरन झटपट माघारी परतला. कर्णधार अश्विनने मिलरला बर्‍यापैकी साथ दिली. मिलरला धवल कुलकर्णीने ४० धावांवर बाद करून त्याला अर्धशती खेळी करू दिली नाही. मनदीप सिंगला आर्चरने भोपळादेखील फोडू दिला नाही. राजस्थानतर्फे आर्चरने सुरेख मारा करताना अवघ्या १५ धावांत ३ बळी टिपले. त्याने गेल, पुरण आणि मनदीप सिंगचे बळी मिळविले. तर कुलकर्णी उडानकट आणि सोढीला प्रत्येकी एक बळी मिळाला.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x