 
						Sirca Paints Share Price | ‘सिरका पेंट्स लिमिटेड’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोठा लाभ जाहीर केला आहे. कंपनीने नुकताच सेबीला कळवले आहे की, बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी पार पडलेल्या संचालक मंडपाच्या बैठकीत मोफत बोनस शेअर्स वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ‘सिरका पेंट्स लिमिटेड’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. स्टॉक एक्सचेंज फाइलिंगद्वारे कंपनीने ही घोषणा केली आहे. ‘सिरका पेंट्स लिमिटेड’ कंपनीने बुधवार दिनाक 11 मे 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. (Sirca Paints Limited)
कंपनीच्या शेअरची कामगिरी :
‘सिरका पेंट्स इंडिया’ कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 645 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के वाढीसह 645.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. YTD आधारे हा स्टॉक 4.75 टक्के कमजोर झाला आहे. मागील एका वर्षात ‘सिरका पेंट्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 38.77 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 532.59 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात हा शेअरची किंमत 101 रुपयांवरून वाढून 645.05 रुपयांवर पोहोचली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 800 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 598.85 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,763.75 कोटी रुपये आहे.
‘सिरका पेंट्स लिमिटेड’ कंपनी Unico, San Marco, 3 Durante Van सारख्या मालकीच्या किंवा विशेष परवाना धारक ब्रँड अंतर्गत लाकूड कोटिंग्ज आणि इतर सजावटीच्या पेंट्सचे उत्पादन आणि विक्री व्यवसाय करते. कंपनीचे उत्पादने भारत, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, मध्ये निर्यात केले जातात. डिसेंबर 2022 तिमाहीत ‘सिरका पेंट्स इंडिया’ कंपनीने 14.96 टक्के वाढीसह 10.53 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. त्याच वेळी डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीची एकूण निव्वळ विक्री 22.59 टक्के वाढीसह 65.22 कोटी रुपये झाली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		