19 May 2024 6:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

TTML Share Price | स्वस्त झालेल्या टीटीएमएल शेअरमध्ये अचानक तेजी, स्टॉकमध्ये नेमकं काय चाललय? स्टॉक डिटेल्स वाचा

TTML Share Price

TTML Share Price | आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनाक 31 मार्च 2023 रोजी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली. या तेजीचा फायदा टाटा समूहाच्या दूरसंचार क्षेत्राशी संबंधित ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ या कंपनीला देखील झाला आहे. कल ‘टीटीएमएल’ कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला होता. या दरम्यान शेअरची किंमत 5 टक्के वाढीसह 55.49 रुपये किमतीवर पोहचली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही हा स्टॉक अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. तथापि नंतर शेअर 49.80 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर घसरला. 7 एप्रिल 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 210 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Tata Teleservices (Maharashtra) Limited)

टीटीएमएल डिटेल :
2021-22 या आर्थिक वर्षात टीटीएमएल कंपनीवर 19,703.84 कोटी रुपये कर्ज असल्याचा डेटा उपलब्ध आहे. अलीकडेच दूरसंचार राज्यमंत्री ‘देवसिंह चौहान’ यांनी लोकसभेत माहिती दिली की, एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया, सह सहा दूरसंचार कंपन्यांवर 2021-22 या आर्थिक वर्षात 4.17 लाख कोटी रुपयांचे कर्जाचे डोंगर निर्माण झाले आहेत. टाटा समूहाच्या मालकीची ‘टाटा टेलिसर्व्हिसेस’ कंपनीवर 20,162.04 कोटी रुपये कर्ज असून ‘टीटीएमएल’ कंपनीवर एकूण 19,704 कोटी रुपये कर्जाचे डोंगर आहे. याशिवाय ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीवर एकूण 1,91,073 कोटी रुपये कर्ज असून आणि ‘एअरटेल’ कंपनीच्या डोक्यावर 1,03,408 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती मिळत आहे. त्याच वेळी ‘रिलायन्स जिओ’ कंपनीच्या डोक्यावर 42,486 कोटी रुपयांचे कर्ज आहे. तर बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीच्या डोक्यावर 40,400 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती मिळत आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
टाटा ग्रुपच्या ‘टीटीएमएल’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मागील पाच वर्षांत 907 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षांत कंपनीच्या शेअरने लोकांना 2982.78 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 294 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षाच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे 67 टक्के नुकसान केले आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत टीटीएमएल कंपनीच्या निव्वळ तोट्यात घट झाली आहे. या कालावधीत कंपनीचा निव्वळ तोटा 279.79 कोटी रुपयांवर आला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा 302.30 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price on 01 April 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x