13 December 2024 3:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Go Digit Insurance IPO | विराट कोहलीची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा IPO लाँच होतोय, कमाईची मोठी संधी, तपशील जाणून घ्या

Go Digit Insurance IPO

Go Digit Insurance IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या साठी एक जबरदस्त संधी चालून आली आहे. कॅनडाच्या ‘फेअरफॅक्स’ आणि भारतीय क्रिकेटपटू ‘विराट कोहली’ यांची गुंतवणूक असलेल्या ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स’ कंपनीचा IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स’ कंपनीने नुकताच IPO साठी शेअर बाजार नियामक सेबीकडे मसुदा कागदपत्रे सबमिट केले आहे. ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स’ कंपनीने मार्केट रेग्युलेटर सेबीने उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण केल्यानंतर पुन्हा एकदा IPO साठी मसुदा कागदपत्रे सबमिट केले आहेत. सेबीने ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स’ कंपनीच्या ESOP प्लॅनबद्दल चिंता व्यक्त केली होती. यापूर्वी ही कंपनीने सेबीकडे IPO मसुदा कागदपत्रे दाखल केले होते. (Go Digit Insurance Limited)

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा’ यांची कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक
विराट कोहली’ आणि त्याची पत्नी ‘अनुष्का शर्मा’ यांनी ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स’ कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स’ कंपनी आपल्या IPO मध्ये 1250 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स इश्यू करणार आहे. याव्यतिरिक्त कंपनीचे प्रवर्तक आणि शेअर धारक 109.45 दशलक्ष शेअर्स ऑफर फॉर सेल अंतगत खुल्या बाजारात विकणार आहे. क्रिकेटर ‘विराट कोहली’ आणि अभिनेत्री ‘अनुष्का शर्मा’ हे कंपनीच्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. कंपनी आपल्या फ्रेश इश्यूमधून जमा होणारी रक्कम कंपनीच्या भांडवली खर्च भागवण्यासाठी आणि सॉल्व्हेंसी पातळी राखण्यासाठी तसेच सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी खर्च करणार आहे.

गो डिजिट कंपनीचा IPO ऑगस्ट 2022 मध्ये प्रथमच दाखल करण्यात आले होते. ही कंपनी मुख्यतः सामान्य विमा क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये कॅनेडियन अब्जाधीश प्रेम व्हॅट्स यांची ‘फेअरफॅक्स ग्रुप कंपनी’आणि cटीव्हीएस कॅपिटल फंड’ यासारखे दिग्गज संस्था सामील आहेत. ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स’ कंपनीने मागील वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये प्रथमच आयपीओ जाहीर करण्यासाठी कागदपत्रे सेबीकडे सबमिट केले होते. शेअर इश्यूशी संबंधित अनुपालन समस्यांमुळे बाजार नियामक सेबीने सप्टेंबर 2022 मध्ये सूचीकरण योजना स्थगित केल्या होत्या. त्यानंतर या वर्षी जानेवारी 2023 मध्ये सेबीने पुन्हा ESOP योजनांशी संबंधित अनुपालन समस्यांचे प्रकरण हाती घेतले होते. आता पुन्हा कंपनीने आपले नविन कागदपत्र सेबीकडे सादर केले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Go Digit Insurance IPO check details on 1 April 2023.

हॅशटॅग्स

Go Digit Insurance IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x