13 May 2024 8:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

Avanti Feeds Share Price | कडक! गुंतवणूकदारांना 12483% परतावा देणाऱ्या शेअरवर तज्ञांकडून नवीन टार्गेट प्राईस, स्टॉक खरेदी करणार का?

Avanti Feeds Share Price

Avanti Feeds Share Price | प्रॉन फिश ट्रेडिंग करणाऱ्या ‘अवंती फीड्स’ कंपनीचे शेअर्स मागील सहा महिन्यापासून घसरत आहेत. मागील आठवड्यात शेअरची किंमत वार्षिक नीचांक किंमत पातळीवर आली होती. मात्र दीर्घ कालीन गुंतवणुकदारांना कंपनीने मालामाल केले आहे. मागील 12 वर्षात ‘अवंती फीड्स’ कंपनीच्या शेअरने 80,000 रुपये गुंतवणुक केलेल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीवरून 27 टक्क्यांनी वाढू शकतो. आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.19 टक्के वाढीसह 346.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Avanti Feeds Limited)

गुंतवणुकदार झटपट करोडपती :
‘अवंती फीड्स’ कंपनीचे शेअर्स 8 एप्रिल 2011 रोजी फक्त 2.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील बारा वर्षात शेअरमध्ये 12483 टक्क्यांची वाढ झाली आहे. दीर्घ कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ पैसा कमावून दिला आहे. म्हणजे फक्त 11-12 वर्षांत 80,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर या शेअरने लोकांना एक कोटीपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. दीर्घ काळात गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा देणाऱ्या कंपनीचे शेअर्स सध्या कमालीच्या चढ उतराला तोंड देत आहेत. मागील सहा महिन्यापासून हा स्टॉक घसरत आहे. याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मागील वर्षी 16 सप्टेंबर 2022 रोजी ‘अवंती फीड्स’ कंपनीचे शेअर्स 527.95 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तथापि स्टॉकची तेजी येथेच थांबली आणि पुढील सहा महिन्यांपासून शेअर 28.76 टक्के घसरुन सध्याच्या किमतीवर आला आहे. या शेअरने नुकताच 321.15 रुपये ही आपलं वार्षिक नीचांक पातळी स्पर्श केली होती. यानंतर शेअर्सची खरेदी पुन्हा वाढली आत्तापर्यंत स्टॉकमध्ये 6 टक्के सुधारणा झाली आहे. परंतु तरीही शेअर आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 36 टक्के कमजोर आहे.

स्टॉक मधील पुढील ट्रेंड :
‘अवंती फीड्स’ ही कंपनी मुख्यतः मासे आणि मासळी संबंधित क्षेत्रात व्यवसाय करते. कंपनी प्रॉन फिशची निर्यातही करते. कंपनी थायलंडच्या ‘थाई युनियन ग्रुप’ सोबतही संयुक्त उपक्रमात सामील आहे. ब्रोकरेज फर्म जिओजित बीएनपी परिबसने घटती मागणी आणि वाढता खर्च यामुळे शेअरची लक्ष किंमत 548 रुपयांवरून कमी करून 420 रुपये निश्चित केली आहे. तथापि कंपनीच्या मार्जिन आणि आकर्षक मूल्यांकनांमध्ये हळूहळू सुधारणा होत असल्याने तज्ञांनी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग दिली आहे. ‘अवंती फीड्स’ कंपनी आपला व्यवसाय विस्तार करत आहे, आणि पुढील काळात कंपनीच्या उत्पादनांची मागणी पुन्हा वाढेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. या कारणास्तव ब्रोकरेज फर्मने 31 मार्च 2023 रोजी जाहीर केल्या अहवालात स्टॉकबाबत रेटिंग अपग्रेड केले आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने 13 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर केलेल्या अहवालात शेअरची लक्ष किंमत 430 रुपये निश्चित केली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Avanti Feeds Share Price on 3 April 2023.

हॅशटॅग्स

Avanti Feeds Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x