12 May 2024 12:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250 My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641 Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार
x

KEI Industries Share Price | शेअर असावा तर असा! एक लाखाच्या गुंतवणुकीवर या स्टॉकने दिला अडीच कोटी परतावा

KEI Industries Share Price

KEI Industries Share Price | ‘केईआय इंडस्ट्रीज’ या होम वायर आणि हाय व्होल्टेज वायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 24000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत ‘केईआय इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 7 रुपये वरून वाढून 1700 रुपयांवर पोहचले आहेत. या मल्टीबॅगर स्टॉक कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1744 रुपये होती. त्याच वेळी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1040 रुपये होती. सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी ‘केईआय इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 0.021 टक्के वाढीसह 1,699.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (KEI Industries Limited)

1 लाख रुपयेवर 2.4 कोटी परतावा :
‘KEI इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 16 ऑगस्ट 2013 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘KEI इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या शेअर धारकांना 24125 टक्के परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 16 ऑगस्ट 2013 रोजी ‘केईआय इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 2.42 कोटी रुपये झाले असते.

3 वर्षात 470 टक्के परतावा :
‘KEI इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. 31 एप्रिल 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये ‘केईआय इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 295.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी ‘केईआय इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 5.73 लाख रुपये झाले असते. ‘केईआय इंडस्ट्रीज’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15272 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘केईआय इंडस्ट्रीज’ कंपनीने 1784.32 कोटी रुपये महसूल संकलन केला होता. त्याचवेळी डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंप ननीने 128.61 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KEI Industries Share Price on 04 April 2023.

हॅशटॅग्स

#KEI Industries Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x