20 May 2024 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक
x

Tarapur Transformers Share Price Today | 4 रुपयांचा पेनी शेअर दररोज 20% वाढतोय, 5 दिवसात 49% परतावा, खरेदी करणार?

Tarapur Transformers Share Price

Tarapur Transformers Share Price Today | ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी पाहायला मिळाली होती. आज शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.74 टक्के वाढीसह 4.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Tarapur Transformers Limited)

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 6.50 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2.85 रुपये होती.

‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ ही कंपनी पॉवर ट्रान्सफॉर्मरचे उत्पादन, दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम करते. ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ ही एक मायक्रो कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 8.09 कोटी रुपये आहे. ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीने मागील आर्थिक वर्षात आपले बरेच कर्ज कमी केले असून कंपनी लवकरच कर्जमुक्त होणार आहे. या कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षांत 34.75 टक्के CAGR दराने वार्षिक नफा कमावला आहे.

मे 2010 मध्ये ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 4.55 रुपयांपर्यंत घसरला आहे. म्हणजेच 2010 नंतर या कंपनीचे शेअर्स 90 टक्के कमजोर झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 6.19 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. तर YTD आधारे 3.41 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 49.18 टक्के वाढले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tarapur Transformers Share Price Today on 21 April 2023.

हॅशटॅग्स

Tarapur Transformers Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x