
TTML Share Price | टाटा समूहाच्या दूरसंचार क्षेत्राशी संबंधित ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये TTML कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. तर आज गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 64.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 49.80 रुपये होती. त्याचप्रमाणे 7 एप्रिल 2022 रोजी हा स्टॉक 210 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. (Tata Teleservices (Maharashtra) Ltd)
मल्टीबॅगर परतावा :
टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील एक वर्षापासून मोठ्या प्रमाणात विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 79 टक्के कमजोर झाले आहेत. मागील वर्षी जानेवारी 2022 मध्ये टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 290 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. YTD आधारे टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड स्टॉक 30.12 टक्के कमजोर झाला आहे. तथापि मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून हा स्टॉक 15 टक्के मजबूत झाला आहे.
कंपनीवर कर्जाचे डोंगर :
टाटा समूहाच्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचा निव्वळ तोटा डिसेंबर 2022 तिमाहीत घटला होता. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीला 279.79 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला 302.30 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. 2021-22 या आर्थिक वर्षात टीटीएमएल कंपनीवर 19,703.84 कोटी रुपये कर्जाचे डोंगर होते. नुकताच दूरसंचार राज्यमंत्री देवसिंह चौहान यांनी लोकसभेत माहिती दिली की, एअरटेल, रिलायन्स जिओ, आणि व्होडाफोन आयडिया, यासह सहा इतर दूरसंचार कंपन्याच्या डोक्यावर 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण 4.17 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीवर एकूण 20,162.04 कोटी रुपये कर्ज आहे, तर टीटीएमएल कंपनीच्या डोक्यावर 19,704 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.