7 May 2025 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Go Digit General Insurance IPO | आला रे आला IPO आला! गो डिजिट जनरल इन्शुरन्स IPO लाँच होतोय, IPO तपशील जाणून घ्या

Go Digit General Insurance IPO

Go Digit General Insurance IPO | ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड’ कंपनीने परत एकदा स्टॉक मार्केट नियामक SEBI कडे आयपीओसाठी कागदपत्रे दाखल केले आहेत. मात्र, यावेळी कंपनीने सेबीद्वारे सुचवण्यात आलेले बदल लागू केले आहेत. ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड’ कंपनीने गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ही माहिती जाहीर केली. यापूर्वी 30 जानेवारी 2023 रोजी, SEBI ने ‘GoDigit’ कंपनीचे ड्राफ्ट IPO कागदपत्रे पुन्हा पाठवले होते, आणि कंपनीला काही अपडेटसह कागदपत्रे पुन्हा फाइल सादर करण्याची सूचना केली होती. (Go Digit General Insurance Limited)

‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड’ IPO प्रस्ताव:
‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड’ कंपनीच्या IPO मध्ये 1,250 कोटी रुपये मूल्याचे इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात जारी केले जाणार आहे. सेबीला सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कंपनीच्या आयपीओच्या आकार पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आला आहे. गो डिजिट कंपनीच्या IPO मध्ये 10.94 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकले जातील. कंपनी आयपीओमधून जमा होणारा पैसा भांडवली सुविधा वाढवण्यासाठी खर्च करणार आहे. ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड’ कंपनीने शेअर IPO द्वारे भांडवल उभारण्यासाठी ऑगस्ट 2022 मध्ये पहिल्यांदा प्रथम ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजेच DRHP दाखल केला होता. तथापि, सेबीने नियामक त्रुटींचा हवाला देत कागदपत्रे कंपनीकडे परत केली.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘विराट कोहली’ ला अनेकदा तुम्ही टीव्हीवर ‘GO डिजिट’ कंपनीचे प्रमोशन करताना पाहिले असेल. विराट कोहली आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड’ कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. गो डिजिट ही एक विमा कंपनी असून आपल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोटार विमा, आरोग्य विमा, प्रवास विमा, मालमत्ता विमा, सागरी विमा यासह अनेक विमा सेवा ऑफर करते. क्लाउडवर पूर्णपणे ऑपरेट करणारी ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड’ ही भारतातील पहिली कंपनी मानली जाते. कंपनीने अनेक चॅनल भागीदारांचा समावेश असलेला ‘ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस’ म्हणजेच API देखील विकसित केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Go Digit General Insurance IPO is ready to launch soon details on 08 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Go Digit General Insurance IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या