14 May 2024 6:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Tata Power Share Price Today | 3 वर्षांत गुंतवणुकदारांना 503.08 टक्के परतावा दिला, टाटा म्हणजे नो घाटा, खरेदी करणार?

Tata Power Share Price

Tata Power Share Price Today | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा पॉवर’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मात्र अनेक ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ‘जेएम फायनान्शिअल’ कंपनीने ‘टाटा पॉवर’ कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक 220 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के घसरणीसह 195.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Tata Power Limited)

संचालक मंडळाची बैठक आयोजित :
टाटा पॉवर कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 4 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीच्या मार्च 2023 तिमाही निकालांशिवाय लाभांश वाटपाच्या प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 503.08 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 110 टक्के वधारले आहेत. टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मागील एक वर्ष, सहा महिने, तीन महिने आणि एक महिने या कालावधीत नकारात्मक परतावा दिला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
टाटा पॉवर कंपनीने कोईम्बतूरमध्ये 20 सार्वजनिक इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखली असून त्यासाठी कंपनीने कोईम्बतूर महानगरपालिकेसोबत भागीदारी करार केला आहे. तामिळनाडूमध्ये या ईव्ही चार्जिंग स्टेशन्सच्या स्थापनेमुळे टाटा पॉवर कंपनीच्या ईव्ही चार्जिंग स्टेशनची एकूण संख्या 116 वर पोहोचली आहे. हे चार्जिंग स्टेशन कोईम्बतूर आणि जवळपासच्या शहरांमधील इलेक्ट्रिक वाहन मालकांना 24×7 चार्जिंग सेवा आणि देखभाल सेवा सुविधा प्रदानसाठी उभारण्यात येत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price today on 24 April 2023.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x