18 May 2024 10:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा
x

Deep Industries Share Price | स्टॉक स्प्लिटनंतर शेअरची किंमत निम्म्यावर आली, स्वस्तात शेअर खरेदी करून फायदा उचला

Deep Industries Share Price

Deep Industries Share Price | ‘दीप इंडस्ट्रीज’ या ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर्स विभाजनीची घोषणा केली होती. ‘दीप इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स काल म्हणजेच सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्स स्प्लिट म्हणून ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात ‘दीप इंडस्ट्रीज’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 8.15 टक्क्याहून अधिक परतावा कमावून दिला आहे. ‘दीप इंडस्ट्रीज’ या स्मॉल कॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 906.56 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 141.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Deep Industries Limited)

स्टॉक स्प्लिट डिटेल :
‘दीप इंडस्ट्रीज’ कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक फाइलिंगमध्ये कळवले आहे की, कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर 2 भागामध्ये विभाजित करणार आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 5 रुपये होईल. कंपनीने शेअर्स विभाजन करण्यासाठी रेकॉर्ड डेट म्हणून 10 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित केली होती. ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये होते त्यांना कंपनीने स्टॉक स्प्लिटचा फायदा दिला आहे.

मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘दीप इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरची किंमत 1.77 टक्के वाढीसह 291.15 रुपये पातळीवर पोहचली होती. मागील एका वर्षात ‘दीप इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सची किंमत 9 टक्क्यांनी वधारली आहे. मागील 6 महिन्यांत ‘दीप इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्समध्ये 3.11 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 322 होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Deep Industries Share Price on 11 April 2023.

हॅशटॅग्स

Deep Industries Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x