14 May 2024 8:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Tata Power Share Price | सुवर्ण संधी! टाटा पॉवर शेअरमध्ये तेजीचे संकेत, आता अजून एक सकारात्मक बातमी, तपशील जाणून पैसे गुंतवा

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी 3 टक्के वाढीसह 228.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका घोषणेनंतर पाहायला मिळाली आहे. टाटा पॉवर कंपनीने छत्तीसगड राज्यात 1,744 कोटी रुपयेचा स्मार्ट मीटरिंग प्रकल्प उभारण्याचा कंत्राट जिंकला आहे.

छत्तीसगड स्टेट पॉवर डिस्ट्रिब्युटर कंपनी लिमिटेडने ही ऑर्डर दिली आहे. टाटा पॉवर कंपनीने जाहीर केलेल्या एका निवेदनात या नवीन ऑर्डरबाबत माहिती दिली आहे. आज शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी 0.59 टक्के घसरणीसह 228.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ऑर्डर तपशील :

टाटा पॉवर कंपनीला छत्तीसगड राज्यात स्मार्ट मीटरिंग प्रकल्प राबविण्यासाठी 1,744 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. छत्तीसगड डिस्कॉम एलओए अंतर्गत विविध क्षेत्रांतील तीन पॅकेजसाठी सीएसपीडीसीएलने जारी केलेल्या निविदांमध्ये टाटा पॉवर कंपनीने बोली लावली होती. हा प्रकल्प छत्तीसगड राज्यात रायपूर प्रदेशात पुढील 10 वर्षात पूर्ण करणे अपेक्षित आहे. टाटा पॉवर कंपनीला मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 18.60 लाख मीटर बसवायचे आहे.

टाटा पॉवर कंपनीच्या सीईओ आणि एमडी यांनी एका निवेदनात माहिती जाहीर केली की, “CSPDCL स्मार्ट मीटरिंग प्रकल्प राबविण्यासाठी टाटा पॉवर कंपनीने 1,744 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त केली आहे. ही माहिती जाहीर करताना टाटा पॉवर कंपनीला आनंद होत आहे.

टाटा पॉवर कंपनीला वीज वितरक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणारे प्रकल्प, नवीन प्रकल्पामध्ये डिझाईन, पुरवठा, स्थापना, कमिशनिंग, त्यानंतर ग्राहक स्तरावर आणि वितरण ट्रान्सफॉर्मर स्तरावर स्मार्ट मीटरचे ऑपरेशन आणि देखभाल यांसारखे नवीन प्रकल्प आणि ऑर्डर्स मिळाले आहेत. हा नवीन प्रकल्प सुधारित वीज वितरण क्षेत्र योजना अंतर्गत राबवला जाणार आहे.

यामुळे टाटा पॉवर कंपनीचा निर्दिष्ट क्षेत्रातील AT & C तोटा सुधारेल आणि CSPDCL अंतर्गत महसूल संकलमत वाढ होईल. CSPDCL ही छत्तीसगढ राज्याच्या मालकीची सरकारी वीज वितरण कंपनी असून छत्तीसगड राज्यात लोकांना वीज पुरवठा करण्याचे काम करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price today on 07 July 2023.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x