11 May 2025 11:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचं कार्टुन नेटवर्क होईल

Aditya Thackeray, Shivsena, Udhav Thackeray

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. देशात पंतप्रधान पदासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, असे म्हणत राहुल गांधींना लक्ष्य केलं. राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचं कार्टुन नेटवर्क होईल, अशी व्यंगात्मक टीका देखील आदित्य ठाकरेंनी केली. शिर्डीतील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी आयोजित सभेत आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची खिल्ली उडवली.

राहुल गांधी जर देशाचे पंतप्रधान झाले तर देशाचं काय होईल. आपला देश कुठं जाईल,. देशाचं कार्टुन नेटवर्क होईल, आपल्या असे आदित्य ठाकरेंनी म्हटले. मी आपल्या खासदारांच्या प्रचारासाठी येथे आलो आहे, त्यांच्या कामाची माहिती देण्यासाठी येथे आलोय. १० कोटी रुपयांची ऑफर कुणीही स्विकारली असती. परंतु, आपले खासदार म्हणाले, मी जनतेतून आलोय, जनतेचीच कामे करणार. असे म्हणत आदित्य यांनी शिर्डीतील शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांचं कौतुक केलं.

त्यानंतर बोलताना, मी तुम्हाला विचारतो देशाचे पंतप्रधान कोण… सांगा कोण… मोदींशिवाय आहे का दुसरा पर्याय. विरोधकांकडे तर दुसरं नावही नाही, असे म्हणत आदित्य यांनी भाषणात वडिल उद्धव ठाकरेंची स्टाईल मारली. तसेच राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचं कार्टुन नेटवर्क होईल, असेही ते म्हणाले. आदित्य यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनीही दाद दिली. दरम्यान, लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षाचे नेते प्रचाराच्या सभा घेत आहेत. तर, या नेत्यांची मुलेही प्रचारात अग्रेसर झाली आहेत. त्यामध्ये आदित्य ठाकरे सक्रीयपणे लोकसभा निवडणूक प्रचारात उतरल्याचे दिसून येत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या