19 May 2024 5:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल
x

Suryalata Spinning Mills Share Price | कमी कालावधीत 157 टक्के परतावा देणारा शेअर, हा स्टॉक खरेदी करावा का?

Suryalata Spinning Mills Share Price

Suryalata Spinning Mills Share Price | ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीने मागील तीन महिन्यांत 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 157 टक्के उसळी घेतली आहे. या मायक्रोकॅप कंपनीच्या स्टॉकने 23 डिसेंबर 2022 रोजी 272.40 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या वर्षी 11 एप्रिल 2023 रोजी ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीच्या शेअर्सनी 700 रुपये ही आपली उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. तीन महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 2.56 लाख रुपये झाले आहे. (Suryalata Spinning Mills Limited)

शेअरमध्ये सतत वाढ :
मागील काही ट्रेडिंग सेशनपासून या स्टॉकमध्ये सतत वाढ होत आहे. मात्र आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ या कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के घसरणीसह 688.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 697.90 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आणि इंट्राडे ट्रेडमध्ये 1 टक्के पेक्षा जास्त घसरणीसह 683.70 रुपये किमतीवर आले होते. मागील.एका वर्षात ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 71.55 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 मध्ये या स्टॉकने लोकांना 124 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 293.08 कोटी रुपये आहे. ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीचे शेअर्स ओव्हरसोल्ड झोनमध्ये नसून स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 68.2 अंकावर आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 120.26 टक्के परतावा कमावून दिला आहे.

‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीच्या स्टॉकचा बीटा 0.4 आहे, जो मागील एका वर्षातील सर्वात कमी अस्थिरता दाखवत आहे. ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या वर ट्रेड करत आहे. विशेष म्हणजे या कंपनीच्या प्रवर्तकांनी डिसेंबर 2022 तिमाहीच्या शेवटी 35.98 टक्के म्हणजेच 10.80 लाख शेअर्स तारण ठेवले आहे. कंपनीच्या प्रवर्तकांकडे डिसेंबर 2022 पर्यंत 70.36 टक्के भाग भांडवल होता. कंपनीच्या सार्वजनिक भागधारकानी 29.64 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. यापैकी 3120 सार्वजनिक भागधारकांकडे 6.33 लाख शेअर्स म्हणजेच कंपनीचे 14.85 टक्के भाग भांडवल आहे, ज्याचे मूल्य 2 लाख रुपयांपर्यंत आहे . डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये 7.29 टक्के भाग भांडवल असलेल्या नऊ शेअर धारकांकडे 2 लाख रुपये पेक्ष जास्त मूल्याचे भांडवल होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suryalata Spinning Mills Share Price on 12 April 2023.

हॅशटॅग्स

Suryalata Spinning Mills Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x