18 May 2024 9:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

TRF Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मजबूत तेजीत! अवघ्या 5 दिवसात दिला 85 टक्के परतावा, पुढेही मोठी कमाई

TRF Share Price

TRF Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टीआरएफ कंपनीचे शेअर्स मागील सहा दिवसांपासून तेजीत वाढत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण झाली आहे. मंगळवारी टीआरएफ कंपनीच्या शेअर्सने आपली विक्रमी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीआरएफ कंपनीचे शेअर्स 7.7 टक्के वाढीसह 509.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी टीआरएफ कंपनीचे शेअर्स 2.54 टक्के घसरणीसह 468.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

मागील सहा दिवसांत टीआरएफ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 99.30 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, टाटा स्टील आणि TRF यांचा विलीनीकरण प्रस्ताव रद्द झाला आहे. टाटा स्टील कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने टीआरएफ लिमिटेड कंपनीच्या कामगिरीतील सुधारणा लक्षात घेऊन विलीनिकरण प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

टाटा स्टील कंपनीने यापूर्वी टीआरएफ, टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स, टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया, टाटा मेटालिक्स, द इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्ट्स, टाटा स्टील मायनिंग लिमिटेड आणि एस अँड टी मायनिंग कंपनी यासारख्या एकूण नऊ कंपन्यांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. टाटा स्टील मायनिंग लिमिटेड कंपनीचे विलीनीकरण 1 सप्टेंबर 2023 रोजी पूर्ण झाले आहे.

तर टाटा स्टील लॉन्ग प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीचे विलीनीकरण 15 नोव्हेंबर 2023 रोजी पूर्ण झाले आहे. S&T Mining Company Limited कंपनीचे विलीनीकरण 1 डिसेंबर 2023 रोजी पूर्ण झाले आहे. तर The Tinplate Company of India Limited या कंपनीचे विलिनीकरण 15 जानेवारी 2024 रोजी पूर्ण झाले आहे. आणि Tata Metaliks Limited कंपनीचे विलीनीकरण 1 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्ण झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TRF Share Price NSE Live 14 February 2024.

हॅशटॅग्स

TRF Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x