24 May 2024 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पडेल! हा शेअर देईल 100 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग IEL Share Price | 13 पैशाच्या शेअरची कमाल, दिला 5384 टक्के परतावा, आजही अत्यंत स्वस्त आहे स्टॉक HBL Power Share Price | अल्पावधीत हजारो टक्क्यांमध्ये परतावा देतोय हा शेअर, यापूर्वी दिला 5367 टक्के परतावा Vodafone Idea Share Price | वाईट काळ संपला! व्होडाफोन आयडिया स्टॉकची रेटिंग अपग्रेड, अप्पर सर्किट सुरु Suzlon Share Price | ब्रेकआऊटचे संकेत? सुझलॉन स्टॉक तेजीत धावणार, नवीन अपडेटनंतर शेअर मोठा परतावा देणार Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक तगडा परतावा देणार, फायदा घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट जाणून घ्या
x

Multibagger Stock | हा शेअर दिग्गज गुंतवणूकदार खरेदी करत आहेत, आधीच 130% परतावा दिला आहे, अजून कमाई करणार?

Multibagger Stock

Multibagger Stock| शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘डॉली खन्ना’ यांनी मार्च 2023 तिमाहीत आपल्या पोर्टफोलिओमध्ये ‘सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज’ कंपनीचे शेअर्स सामील केले आहेत. ‘डॉली खन्ना’ यांनी या ब्रुअरीज क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनीचे 9.53 लाख इक्विटी शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडले आहेत. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. ‘डॉली खन्ना’ शेअर बाजारात मजबूत शेअर मध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा कमावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये उत्पादन, कापड, रसायने आणि साखर क्षेत्रातील दिग्गज कंपन्याचे शेअर्स आहेत. डॉली खन्ना यांनी ‘सोम डिस्टिलरीज’ कंपनीचे 1.29 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.93 टक्के वाढीसह 156.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Som Distilleries And Breweries Ltd)

‘BSE वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार ‘डॉली खन्ना’ यांनी मार्च 2023 तिमाहीमध्ये ‘सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज’ कंपनीचे 1.29 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. त्यात त्यांनी एकूण 9,53,603 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहे. मागील 1 वर्षात ‘सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 130 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच एक वर्षभरापूर्वी जर तुम्ही या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2.30 लाख रुपये झाले असते.

2023 मधे आतापर्यंत या कंपनीच्या स्टॉकने लोकांना 30 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. ‘सोम डिस्टिलरीज’ ही भारतातील आघाडीची अल्कोहोल ब्रुअरीज उत्पादक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1993 साली झाली होती. ‘सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,143 कोटी रुपये आहे.

डॉली खन्ना पोर्टफोलिओ :
डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या 14 स्टॉक दमदार स्टॉक आहेत. ट्रेंडलाइननुसार, मार्च 2023 पर्यंत डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओमध्ये 14 स्टॉक असून त्यात उत्पादन, कापड, रसायने आणि साखर कंपन्यांचे शेअर्स आहेत. 11 एप्रिल 2023 पर्यंत ‘डॉली खन्ना’ यांच्या पोर्टफोलिओचे एकूण मूल्य 229.6 कोटी रुपये आहे. शेअर बाजारातील अनेक गुंतवणुकदार डॉली खन्ना यांचा पोर्टफोलिओ फॉलो करतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock is added in dolly Khanna portfolio, check details on 12 April 2023

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x