9 May 2024 9:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Suzlon Energy Share Price | या एका मोठ्या बातमीनंतर 8 रुपये किंमतीचा सुझलॉन एनर्जीचा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी

Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price | ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीची मालकी असणाऱ्या ‘सुझलॉन ग्रुप’ ने ‘सेम्बकॉर्प’ची उपकंपनी ‘ग्रीन इन्फ्रा विंड एनर्जी लिमिटेड’ या कंपनीच्या 50.4 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा व्यापारी करार केला आहे. ही बातमी येताच ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स तेजीत वाढू लागले आहेत. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1.23 टक्के वाढीसह 8.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 2007 साली ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 348 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Suzlon Energy Limited)

‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कडे असलेल्या कर्नाटक प्रकल्पाचे काम 2024 पूर्ण होणार आहे. ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ ही कंपनी कर्नाटक प्रोजेक्टमध्ये पवन ऊर्जा टर्बाइनचा पुरवठा करणार आहे. शिवाय ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ प्रोजेक्टची स्थापना आणि लॉन्चिंगचे काम देखील पार पडेल. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर त्याचे संचालन आणि देखभालाची जबाबदारी देखील ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ वर सोपवण्यात आली आहे. कर्नाटक प्रोजेक्ट ‘सेम्बकॉर्प’ ने ‘रेल्वे एनर्जी मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड’ कडून जिंकलेल्या कंत्राटचा भाग आहे.

‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीने कालच्या बैठकीत एक निवेदन जाहीर करून माहिती दिली आहे की, ” प्रोजेक्ट ऑर्डरचा एक भाग म्हणून सुझलॉन एनर्जी कंपनी 24 विंड टर्बाइन जनरेटर प्रत्येक हायब्रीड लॅटिस ट्युब्युलर टॉवरसह 2.1 MW च्या क्षमतेसह स्थापन करेल”. सुझलॉन ग्रुपचे मुख्य सीईओ जेपी चालसानी म्हणाले, “पवन ऊर्जा क्षेत्रातील 28 वर्षांचा दांडगा अनुभव असलेली ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनी भारताच्या तापमान वाढ विरुद्धच्या लढ्यात योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. ‘SEMBCORP INDIA’ ने आपल्या शाखा भारतातील 18 राज्यांमध्ये विस्तारलेल्या आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Energy Share Price on 13 April 2023.

हॅशटॅग्स

#Suzlon Energy Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x