
Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी ‘झोमॅटो’ च्या शेअर्समध्ये मजबूत ब्रेक आऊट पाहायला मिळत आहे. शेअरमधील वाढ पाहून अनेक ब्रोकरेज हाऊस शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी ‘झोमॅटो’ कंपनीच्या शेअर्सवर 100 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ‘झोमॅटो’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात सध्याच्या किंमत पातळीपासून 90 टक्के पर्यंत वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘झोमॅटो’ कंपनीचे शेअर्स 53.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के वाढीसह 53.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Zomato Limited)
‘झोमॅटो’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 88.20 रुपये होती. त्याच वेळी झोमॅटो कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 40.55 रुपये होती. बुल केस परिस्थितीत ‘झोमॅटो’ कंपनीचे शेअर्स 150 रुपये पर्यंत वाढू शकतात, असा अंदाज ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीजने व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष 2022-26 मध्ये ‘झोमॅटो’ चे वितरण महसूल 25 टक्के CAGR वाढण्याची शक्यता आहे. Jefferies ने ‘झोमॅटो’ कंपनीच्या स्टॉकवर 100 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. जेफरीज फर्मचा असा विश्वास आहे की, झोमॅटो कंपनीचे डिलिव्हरी महसूल बुल केस परिस्थितीत आर्थिक वर्ष 2022-26 मध्ये 30 टक्के CAGR ने वाढू शकतात.
शेअर बाजाराच्या तेजीच्या काळात ‘झोमॅटो’ कंपनीचे शेअर्स सध्याच्या इम्मत पातळीपासून 185 टक्के वाढू शकतात. ‘झोमॅटो’ कंपनीच्या शेअर्सची उच्चांक किंमत 161.60 रुपये होती. झोमॅटो स्टॉक जुलै 2021 मध्ये स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आले. या कंपनीचे शेअर्स 76 रुपये अप्पर बँडवर इश्यू करण्यात आले होते. ‘झोमॅटो’ कंपनीच्या शेअर्सने नोव्हेंबर 2021 मध्ये 161.60 रुपये ही आपली विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली होती. झोमॅटो कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या ऑल टाइम उच्चांक किमतीच्या 67 टक्के खाली ट्रेड करत आहेत. त्याच वेळी ‘झोमॅटो’ कंपनीचे शेअर्स आपल्या IPO इश्यू किमतीपेक्षा सुमारे 30 टक्के खाली ट्रेड करत आहेत . ‘झोमॅटो’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 45,625 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.