15 May 2025 9:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER IRFC Share Price | 30 टक्के अपसाईड परतावा मिळेल, मल्टिबॅगर पीएसयू शेअर्सबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Mazagon Dock Share Price | रॅलीगीअर ब्रोकिंग फर्म बुलिश, लेटेस्ट टार्गेट प्राईस अलर्ट, मोठ्या कमाईची संधी - NSE: MAZDOCK HAL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल बुलिश, BUY रेटिंग - NSE: HAL Vedanta Share Price | जबरदस्त अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, BUY रेटिंग, मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर - NSE: VEDL Patel Engineering Share Price | 42 रुपयांचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: PATELENG Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: JIOFIN
x

Sprayking Agro Equipment Share Price | पैशाचा पाऊस! 9 महिन्यांत 550% परतावा, प्लस बोनस शेअर्स मिळणार, हा शेअर खरेदी करणार?

Sprayking Agro Equipment Share Price

Sprayking Agro Equipment Share Price | ‘स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट’ या औद्योगिक उत्पादने बनवणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. ‘स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट’ या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट’ कंपनी 3 शेअरवर 2 बोनस शेअर मोफत देणार आहे. या बोनस शेअरसाठी कंपनीने 25 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. (Sprayking Agro Equipment Limited)

9 महिन्यांत 550 टक्के परतावा :
मागील 9 महिन्यांत ‘स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 556 टक्के परतावा कमावून दिला आहे. 18 जुलै 2022 रोजी ‘स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट’ या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 20.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 10 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 131.95 रुपये किमतीवर स्थिरावला आहे. या कंपनीच्या शेअरची ही 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 131.95 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 20.10 रुपये होती. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 895 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी ‘स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट’ कंपनीचे शेअर्स 13.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

‘स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट’ कंपनीचे शेअर्स 2023 या वर्षात 215 टक्के वाढले आहेत. 2023 या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 11 जानेवारी 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 41.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचा मुख्य ग्राहक वर्ग जगभरातील अनेक देशांमध्ये विस्तारला आहे. ही कंपनी मुख्यतः ब्रास फिटिंग्न फोर्जिंग उपकरणे, ट्रान्सफॉर्मरचे भाग, सानुकूलित पितळ भाग, बनवण्याचे काम करते. कंपनीचा ग्राहकवर्ग आणि व्यापार अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि भारतात विस्तारला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sprayking Agro Equipment Share Price on 14 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Sprayking Agro Equipment Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या