18 May 2024 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

NTPC Green Energy IPO | IPO धमाका! सरकारी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा IPO लाँच होणार, गुंतवणुकीपूर्वी तपशील जाणून घ्या

NTPC Green Energy IPO

NTPC Green Energy IPO | ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन’ म्हणजेच ‘NTPC’ ही सरकारी मालकीची कंपनी आपल्या ग्रीन एनर्जी युनिट ‘NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड’ म्हणजेच ‘NGEL’ चा IPO लाँच करण्याच्या तयारीत आहे. ‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ कंपनीचा आयपीओ चालू आर्थिक वर्षात लॉन्च होईल. मलेशियाच्या ‘पेट्रोलियम नॅशनल बर्हाड’/ ‘पेट्रोनास ‘ कंपनीने ‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ कंपनीतील 20 टक्के भाग भांडवलाची ऑफर फेटाळल्याने NTPC आपल्या ग्रीन एनर्जी युनिटचा IPO लॉन्च करण्याचा विचार करत आहे. (NTPC Green Energy Limited)

IPO तपशील :
‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ कंपनीचा आयपीओ पूर्णतः बुक बिल्डिंग आधारावर लाँच केला जाईल. ‘पेट्रोनास’ कंपनीने मागील आठवड्यात ‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ कंपनीतील 20 टक्के हिस्सेदारीच्या बोलीमध्ये ‘आरईसी लिमिटेड’ आणि ‘इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड’ कंपनीपेक्षा जास्त बोली लावली होती. अंतिम बोली प्राप्त झाल्यानंतर कंपनीच्या मूल्यावर बोलणी सुरू झाली, परंतु सर्वात जास्त बोली लावणाऱ्या ‘पेट्रोनास’ कंपनीने अचानक माघार घेतली. ‘पेट्रोनास’ कंपनीने ‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ मधील 20 टक्के भाग भांडवल खरेदी करण्यासाठी सुमारे 4000 कोटी रुपये ऑफर केले होते.

कंपनीचे तपशील :
NTPC कंपनी चालू आर्थिक वर्षात आपल्या 6000 कोटी रुपयांच्या मालमत्तेला कमाईयोग्य मालमत्ता म्हणून रूपांतरित करु इच्छित आहे. या योजनेत ‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ कंपनीच्या आयपीओ ही सामील आहे. आर्थिक घडामोडीच्या कॅबिनेट समितीने म्हणजेच CCEA ने 17 मार्च 2023 रोजी ‘NTPC ग्रीन एनर्जी’ कंपनीमध्ये 5000 कोटी रुपयांच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यास परवानगी दिली होती. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या शेवटी NTPC कंपनीच्या 15 अक्षय ऊर्जा मालमत्ता ‘NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड’ कडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NTPC Green Energy IPO is going to launch soon check details on 15 April 2023.

हॅशटॅग्स

NTPC Green Energy IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x