19 April 2024 5:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

यशस्वी माणसं या '10' गोष्टी करण्यात घालवत नाहीत वेळ वाया - नक्की वाचा

10 things successful people

मुंबई, २७ जून | यश हे एका दिवसात अथवा एका रात्रीत मिळत नाही. यश ही एक प्रक्रिया आहे. यासाठीच ‘success is a process not an event’ असं इंग्रजीत म्हटलं जातं. यश मिळवण्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागतात. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला मग तो श्रीमंत असो वा गरिब, लहान असो वा मोठा दिवसाचे चोविस तासच मिळत असतात. मात्र जी माणसं आयुष्यात यशस्वी होतात ती या चोविस तासांचा वेळ सत्कारणी लावतात. प्रत्येक क्षणी समोर येणाऱ्या संधीचं सोनं करतात. यासाठी यश मिळवण्याच्या या प्रक्रियेत कोणत्या गोष्टी करणं जाणिवपूर्वक टाळावं हे जरूर जाणून घ्या. ज्यामुळे तुमच्या यशाचा मार्ग आपोआप मोकळा होईल.

जीवनात यशस्वी होण्यासाठी या चुका मुळीच करू नका:

1. दिवसभराच्या कामाचं नियोजन न करणे:
दिवसाच्या चोविस तासांचे नियोजन करण्यासाठी तुमच्या दिवसभराच्या कामांचे योग्य नियोजन करण्यास विसरू नका. यासाठी दररोज सकाळी उठल्यावर अथवा रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही दिवसभर करणार असलेल्या कामांची नीट नोंद करा. ज्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी वेळेवर करणं नक्कीच शक्य होईल. वेळेचे व्यवस्थापन केल्यामुळे वेळ वाया नक्कीच जाणार नाही. वेळेचा सदुपयोग झाल्यामुळे तुम्हाला तुमची महत्त्वाची कामे वेळेत करता येतील. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर पडेल. यशस्वी माणसांच्या यशामागे ही एक सर्वात महत्वाची गोष्ट दडलेली असते.

2. काम करताना भावनेच्या आहारी जाणे:
कोणतेही काम करताना भावना आणि बुद्धीचा समतोल राखणं गरजेचं असतं. असं न केल्यास म्हणजेच फक्त भावनेच्या आहारी जाऊन जर तुम्ही एखादे काम केलं तर तुम्हाला हवा तसा परिणाम मिळेलच असं नाही. यासाठीच यशस्वी व्हायचं असेल तर काम करताना बुद्धी आणि भावनांचा योग्य समतोल साधण्याचा प्रयत्न करा.

3. एखाद्या गोष्टीबाबत वायफळ गप्पा मारणे:
लोकांना बऱ्याचदा बिनकामाच्या गप्पा मारण्याची सवय असते. आपण त्याला गॉसिप असं गोंडस नाव देखील देतो. मात्र इतरांबाबत केल्या जाणाऱ्या या गप्पा आपल्या काहीच कामाच्या नाहीत हेच अनेकांना समजत नाही. शिवाय या गप्पा मारण्याच्या नादात आपण आपल्या जीवनातील महत्त्वाचा वेळ सहज वाया घालवतो. ज्यामुळे यशासाठी लागणारे प्रयत्न कमी पडतात. यशस्वी माणसं मात्र जीवनात अशा गप्पा मारण्यात मुळीच वेळ वाया घालवत नाहीत. हे त्यांच्या यशमागचं एक महत्त्वाचं कारण असतं.

4. स्वतःला दोष देत राहणे:
काहीही घडलं तरी त्यासाठी स्वतः ला जबाबदार धरण्याची अनेकांना सवय असते. मात्र असं केल्यामुळे तुमचा आत्मविश्वास नकळत कमी होत जातो. यासाठी केलेल्या चुकांबद्दल स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा त्यातून योग्य धडा घेणं फार गरजेचं आहे. जीवनात यशस्वी झालेल्या माणसांनी आयुष्यात कधीच काही चुका केलेल्या नसतात असं मुळीच नाही. कारण चुकांमधूनच माणसं नवं काहीतरी शिकत असतात. त्यामुळे अशा चुकांसाठी स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा पुढे काय करायचं याचा विचार करणं फार गरजेचं आहे.

5. परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत बसणे:
जीवनात कधी कोणत्या परिस्थितीला माणसाला सामोरं जावं लागेल हे सांगता येत नाही. मात्र जर कधी वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलं. तर नशीबात असेल तसं घडेल अथवा चांगली परिस्थिती येण्याची वाट पाहत राहणं फारच चुकीचं ठरेल. यशस्वी माणसं कधीच अशी परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत राहत नाहीत. उलट योग्य निर्णय घेत परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात.

6. विनाकारण गोष्टींची अती चिंता करणे:
काही वेळा एखाद्या गोष्टीचा अती विचार करत बसल्यामुळे नकळत चिंता, काळजीने तुमचे मन गढूळ होत जातं. असं अती चिंता केल्यामुळे तुमच्या मनात निर्माण होणारी भिती तुमचा वर्तमान काळ खराब करू शकते. शिवाय याचा ताण आल्यामुळे माणसे नैराश्याच्या अधीन जाऊ शकतात. ज्याचा परिणाम नक्कीच घातक ठरू शकतो. असं असेल तर विनाकारण चिंता काळजी करत बसण्यापेक्षा सकारात्मक विचार आणि योग्य प्रयत्न करून तुम्ही तुमच्या जीवनात यश खेचून आणू शकता.

7. निगेटिव्ह लोकांच्या सहवासात राहणे:
माणसाच्या आयुष्यात संगत फार महत्ताची आहे. कारण तुम्ही ज्या संगतीत राहता त्या संगतीचा परिणाम तुमच्या जीवनात नकळत होत असतो. तुमच्या संगतीनुसार तुमची विचारसरणी होत असते. जर तुम्ही चांगल्या लोकांच्या जीवनात राहीलात तर तुमच्या मनात सतत चांगले आणि सकारात्मक विचार येतात. मात्र वाईट संगतीची माणसं स्वतःचे जीवन तर खराब करतातच पण ते इतरांच्या जीवनावर विपरित परिणाम घडवत असतात. यासाठीच यशस्वी माणसं कधीच अशा लोकांच्या संगतीत राहणं पसंत करत नाहीत.

8. जुन्या चुका उगाळत बसणे:
जर जीवन जगत असताना तुमच्या हातून काही चुका घडल्या असतील तर त्या विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कारण त्या चुकांची उजळणी करत राहील्यामुळे त्या नक्कीच सुधारणार नाहीत. उलट त्यांना मागे टाकत जीवनात पुढे त्या चुका करणं कसं टाळता येईल याचा विचार करा.

9. इतरांशी तुलना करत राहणे:
तुलना माणसाच्या आयुष्यात नेहमीच घातक ठरते. प्रत्येक माणसाला त्याच्या विचारसरणीनुसार आणि त्याने केलेल्या कर्मानुसार फळ मिळत असते. मात्र स्वतः काहीही प्रयत्न न करता इतरांशी केवळ तुलना करत बसणं मुळीच चांगलं नाही. तुलना केल्यामुळे फक्त दुःखच माणसाच्या पदरी पडू शकतं. यासाठीच यशस्वी माणसं इतरांशी तुलना करण्यापेक्षा प्रयत्न करून स्वतःचे जीवन सुखी करतात.

10. सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणे:
सोशल मीडिया ही आज काळाची गरज झाली आहे असंच सर्वांना वाटत आहे. सोशल मीडियाच्या भुलभलैयामध्ये तर तरूण पिढी दिवसेंदिवस अडकतच चालली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जगातील विविध गोष्टी सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात. ज्याचे चांगले परिणाम नक्कीच आहेत. मात्र या माध्यमाला किती वेळ द्यावा हे फारच महत्त्वाचं आहे. दिवसभरातील ठराविक वेळ जर तुम्ही या माध्यमासाठी वापरला तर काहीच हरकत नाही. मात्र दिवसभर जर तुम्ही मोबाईल आणि सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहीलात तर यश तुमच्या हातातून कधी निसटून जाईल हे तुम्हाला कळणारच नाही. यासाठीच यशस्वी माणसं या व्यसनापासून नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: 10 things successful people never waste time doing article news updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x