
Metro Land Scam | मुंबई कांजुरमार्गेमधील मेट्रो कारशेडच्या मुद्यावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्ह आहे. कांजुरमार्गमधील 15 हेक्टर जागा देत असताना कुणाला अनुदान देणार आहात? या 44 हेक्टरमधील 15 हेक्टर जागा मेट्रोला वापरणार आहे, तर उरलेली जागा कुणाला दिली जाणार आहे, बिल्डरांना दिली जाणार आहे, यावर नक्की काय होणार आहे, हा एक मोठा घोटाळा आहे, यावर मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कांजुरमार्गमधील जागेबद्दल नवीन खुलासा केला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.
आम्ही सतत अडीच-तीन वर्ष बोलत होतो, लाईन 6 साठी कारशेड गरजेचे आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेड कांजूरमार्गला हलवले होते. लाईन 3, 6, 14 आणि लाईन 4 या चार लाईनचे कार डेपो आपण एकत्र करणार होतो. त्यावेळी जनतेचे, महाराष्ट्राचे पैसै वाचावे आणि वेळ वाचावा, हाच आमचा हेतू होता असं आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राचे 10 हजार कोटी वाचणार होते
चार कारशेड एकत्र केल्याने महाराष्ट्राचे 10 हजार कोटी वाचणार होते. जेव्हा आम्ही हे हे पाऊल उचललं ते्व्हा आरेचे 800 हेक्टर जंगल घोषित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला याची आठवण आदित्य ठाकरे यांनी यावेळी करून दिली.
या घटनेत महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने केद्राला हाक मारली आणि केद्राच्या सॉल्ट कमिश्नरन कोर्टात गोंधळ घातला. यामुळे मुंबईकरांना या इँटिग्रेटेड डेपोपासून वंचित राहावे गेले. तसेच मुंबईकरांचे पैसे कसे उडवले जातील यावर लक्ष केंद्रीत केले गेले. तसेच सरकार पाडल्यानंतर सुप्रीम कोर्टातील केस बंद झाली. याचिकाकर्त्यांना देखील याचिका मागे घेतली. मग आता ही जागा कोणाची आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आम्ही जनतेच्या आणि महाराष्टाचे पैसै वाचवण्यासाठी चार डेपो कांजूरमार्गमध्ये करत होतो. आम्ही हे पाऊल उचलंल आणि भारतीय जनता पक्षाने राजकीय गोंधळ घातला. जेव्हा कारशेड तिथे नेणार होतो, तेव्हा केंद्राने असो वा भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रावर इतके वार का केले? खंजीर का खुपसला? जेणकरून ही महाराष्ट्राची अधिकाराची जागा इतके वर्ष महाराष्ट्राला मिळू नये.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.