20 May 2024 7:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

EKI Energy Services Share Price Today | या शेअरने अल्पावधीत गुंतवणूकदारांचे पैसे 25 पट वाढवले, तुम्ही हा स्टॉक खरेदी केला का?

EKI Energy Services Share Price

EKI Energy Services Share Price Today | ‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ या कंपनीच्या शेअरने मागील दोन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1900 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत कंपनीने आपल्या शेअर धारकांना 3 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स देखील जाहीर केले होते. सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.27 टक्के वाढीसह 514.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (EKI Energy Services Today)

कंपनीच्या शेअरचे तपशील :
‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ कंपनीचा IPO स्टॉक 100 ते 102 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या प्राइस बँडवर खुला करण्यात आला होता. कंपनीने आपल्या IPO मध्ये एक लॉटमध्ये 1200 शेअर्स जारी केले होते. ‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ कंपनी एप्रिल 2021 मध्ये BSE-SME निर्देशांकावर सूचीबद्ध करण्यात आली होती.

मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 1,150 टक्क्यांनी वर गेली आहे. तथापि या SME कंपनीच्या स्टॉकने जुलै 2022 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 3 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. या प्रमाणे ‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1900 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
जर तुम्ही ‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ कंपनीच्या IPO स्टॉकवर पैसे लावले असते तर, तुम्हाला 3 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्सचाही लाभ झाला असता. कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रत्येक शेअरवर 3 बोनस शेअर्स मोफत वाटप केले होते. त्यानुसार ‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ कंपनीमध्ये तुमच्या शेअरची एकूण संख्या 1200 वरून 4800 झाली असती.

4800 शेअर्सनुसार तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 25 लाख रुपये झाले असते. या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकदाराना एक लॉट खरेदी करण्यासाठी 1,22,400 रुपये जमा करावे लागले होते. त्यानुसार सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 24,61,200 रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | EKI Energy Services Share Price Today on 17 April 2023.

हॅशटॅग्स

#EKI Energy Services Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x