
Gold Price Today | जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंददेईल. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीमध्ये सुरू असलेल्या चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर आज सोनं-चांदीच्या आजच्या दरांमध्ये मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोमवारी अधिक हालचाल पाहायला मिळाली नाही. तर सराफा बाजाराबद्दल बोलायचे झाले तर सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण पाहायला मिळाली. सध्या 60,000 रुपयांच्या वर चाललेले सोने अक्षय्य तृतीयेला 65,000 चा टप्पा गाठू शकेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
65,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो दर
फेब्रुवारीमध्ये सोने-चांदीच्या घसरणीनंतर त्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. भविष्यात सोन्याचे दर 65,000 रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचे दर ८०,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या सोन्याचा भाव 60 हजार रुपयांच्या वर आहे. जगभरातील बाजारात सुरू असलेल्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारातही किमतीत अनिश्चिततेचे वातावरण आहे.
सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 60709 रुपयांवर खुला झाला आहे. मागील सत्रात हाच दर 60880 रुपये प्रति दहा ग्राम वर बंद झाला होता. त्यामुळे आज सोने 171 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडले आहे.
सध्या सोनं 171 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त दराने विकला जात आहे. सोन्याने 13 एप्रिल 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोनं 60880 रुपये प्रति दहा ग्राम वर पोहोचलं होतं.
तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे दर
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५५९४० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१०३० रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५५९७० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१०६० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५५९४० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१०३० रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 55970 रुपये, 24 कॅरेट सोने : 61060 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 55940 रुपये, 24 कॅरेट सोने : 61030 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५५९४० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१०३० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५५९७० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१०६० रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 55940 रुपये, 24 कॅरेट सोने : 61030 रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५५९४० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१०३० रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५५९७० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१०६० रुपये
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.