
Govt Employees DA Hike | जुलै महिन्याच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ होण्यापूर्वीच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच वाढ होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा सुमारे 9000 रुपयांची थेट वाढ होणार आहे. सरकार डीए मध्ये कधी वाढ करणार आहे पाहूया.
जुलैमध्ये होणार वाढ
सरकारने मार्चमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली आहे, त्यानंतर महागाई भत्ता 42 टक्के झाला आहे. ही वाढ जानेवारी २०२३ पासून लागू झाली आहे. आता पुढील महागाई भत्ता जुलै २०२३ पासून जाहीर होणार आहे. पुढील वाढही ४ टक्के राहील, अशी अपेक्षा आहे.
पगारात होणार मोठी वाढ
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये चांगली वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामुळे येत्या काळात पगारवाढ होऊ शकते.
50 टक्क्यांपर्यंत पोहोचल्यावर डीए शून्य होईल
महागाई भत्त्याचा नियम असा आहे की, सरकारने सन २०१६ मध्ये सातवा वेतन आयोग लागू केला तेव्हा महागाई भत्ता शून्यावर आणण्यात आला होता. नियमानुसार महागाई भत्ता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचताच तो शून्यावर आणला जाईल आणि ५० टक्क्यांनुसार कर्मचाऱ्यांना भत्त्याच्या स्वरूपात मिळणारा पैसा मूळ वेतनात म्हणजेच किमान वेतनात जोडला जाईल.
9000 रुपयांनी पगारवाढ होणार
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18000 रुपये असेल तर त्याला 50 टक्के डीएचे 9000 रुपये मिळतील. मात्र, ५० टक्के महागाई भत्ता असेल तर तो मूळ वेतनात जोडला जाईल आणि महागाई भत्ता पुन्हा शून्यावर आणला जाईल.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.