4 May 2025 9:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर जोरदार कोसळल्यानंतर आता स्वस्तात खरेदीसाठी ऑनलाईन धावपळ, खरेदी करणार?

Infosys Share Price

Infosys Share Price| भारतातील दिग्गज आयटी कंपनी ‘इन्फोसिस’ ची हालत खूप खराब आहे. सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्याय घसरणीसह 1250.30 रुपये किमतीवर आले होते. दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 11.76 टक्क्यांच्या कमजोरीसह 1226.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 27 लाख शेअर्सची ट्रेडिंग झाली. मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के घसरणीसह 1,255.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Infosys Limited)

इन्फोसिस लक्ष्य किंमत :
मार्च 2023 तिमाहीचे खराब निकाल जाहीर करूनही ब्रोकरेज फर्म जेफरीजने इन्फोसिस कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. Jefferies ने Infosys कंपनीच्या स्टॉकवर 1,570 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. तज्ञांनी या आयटी कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ टॅग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

जेफरीज व्यतिरिक्त , नोमुरा फर्मने आपल्या अहवालात इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 28 टक्क्यांनी वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. नोमुरा फर्मने या कंपनीच्या स्टॉकवर 1,290 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. मार्च 2023 तिमाही मध्ये कंपनीची कामगिरी फार निराशाजनक राहिली आहे.

तिमाही निकाल :
आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत इन्फोसिस कंपनीने 6,128 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला, जो अपेक्षेपेक्षा 7.8 टक्के जास्त आहे. मात्र काही अंशी निव्वळ नफ्यातील ही वाढ फारशी उत्साहवर्धक नाही. विलंबित ग्राहक निर्णय आणि प्रकल्पामधील अनपेक्षित बदलामुळे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीचा महसूल अंदाजपेक्षा कमी राहिला.

यासह कंपनीचे अलीकडील अहवाल अनेक मुद्द्यांवर निराशाजनक सिद्ध झाले आहेत. जागतिक मॅक्रो इकॉनॉमिक अस्थिरतेचे वातावरण, आर्थिक मंदी, युद्ध या सर्व पार्श्वभूमीवर आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीने 4-7 टक्के महसूल वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10.59 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price Today on 18 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(83)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या